हिंगोली : जिल्ह्यातील हिंगोली, वसमत व कळमनुरी विधानसभा मतदारसंघात प्रचार संपला आहे. प्रचारादरम्यान उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. विधानसभेत कांटे की टक्कर होण्याचे संकेत मिळत आहेत. यात कोण सिकंदर ठरणार, हे ता. २३ नोव्हेंबरलाच कळणार आहे. खरी लढत महायुती व महाविकास आघाडी यांच्यातच आहे. आमदार हा शब्द कोणाच्या नावासमोर लागतो, याकडे संपूर्ण मतदारसंघातील जनतेच्या नजरा लागल्या आहेत.