कोरोनाची जनजागृती करणारे लोहा महसुल पथक वाळू घाटावर
नांदेड : जिल्ह्यात कोरोना या जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा जिल्हाधिकारी जीवाचे रान करत आहेत. या आजाराबद्दल ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी महसुल विभागाने काही पथक स्थापन केले आहेत. असेच एक लोहा तालुक्याचे पथक जनजागृती सोडून वाळू घाटावर गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मात्र त्यांनी कुठलीच कारवाई न करता परत येताच त्याचा ठिकाणी मुदखेड महसुलच्या पथकांनी कारवाई केली.
जिल्ह्यातील नागरिक कोरोना या जीवघेण्या आजाराने प्रचंड भितच्या वातावरणात घरी बसुन आहेत. त्यांना जिल्हा प्रशासन धीर देत अत्यावश्यक सेवा पुरवित आहेत. मात्र गोदावरी नदी पात्रातून रात्री यंत्राच्या सह्याने वाळू माफिया आपला गोरखधंदा थांबवायला तयार नाही. वाहतुक बंद असतांना रात्रीच्या वेळी काही शासकिय यंत्रणेला हाताशी धरुन वाहतुक व वाळू उपसा सुरू असल्याचे गुप्त माहिती लोहा तहसिलच्या एका नाय तहसिलदार दर्जाच्या अधिकारी पथकाला ही माहिती मिळाली.
पथक येळी (ता. लोहा) या वाळू घाटावर
या पथकाचे मुख्य काम ग्रामिण भागातील नागरिकांना घराबाहेर न पडून देणे व या आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करणे हे होय. परंतु आपले मुख्य काम सोडून हे पथक येळी (ता. लोहा) या वाळू घाटावर पोहचले. या पथकात एक नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचा समावेश होता. हे पथक तेथे गेले. त्यांना नदी पात्रातून पाईप टकाल्याचे दिसले. मात्र त्यांना सेक्शन पंप दिसला नाही की यांनी पाहिला नाही आणि ते परत फिरले.
दोन तराफे जाळून टाकले
त्यानंतर मुदखेड तसहिलच्या पथकाला ही माहिती मिळताच त्यांनी येळी व परिसरातील वाळ घाटावर छापा टाकला. दोन तराफे जाळून टाकले. ही कारवाई मुदखेड पथकाला करता आली ती लोहा पथकाला का करता आली नाही. याच्या मागे काय गौडबंगाल आहे. याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घाय्वी अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.
येथे क्लिक करा - गुड न्यूज : वीज दरवाढ कमी, उद्योगाना चालना
गुरुद्वारामार्फत गोर- गरिबांना लंगर वाटप
नांदेड : गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाच्या वतीने दोन दिवसापासून गरीब, गरजूं आणि उपाशी नागरिकांना लंगरच्या माध्यमातून अन्नदान केले जात आहे.
कोरोना व्हायरस संक्रमण रोखण्यासाठी देशात लॉकडाउन घोषित करण्यात आल्यानंतर गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अध्यक्ष स. भूपिंदरसिंघ मिनहास, उपाध्यक्ष स. गुरविंदरसिंघ बावा, सचिव स. रवीन्द्रसिंघ बुंगाई यांनी सर्व स्थानीक सदस्यांच्या सहकार्याने गोरगरीब आणि गरजूं नागरिकांना लंगर तयार करून वाटण्याचे निर्णय घेतले. त्यानुसार रविवारी मालटेकडी, सांगवी भागात लंगरचे वितरण करण्यात आले. सोमवार (ता. ३०) मार्च रोजी गुरुद्वारा संगत साहब चौफाळा भागात व अन्य काही ठिकाणी ट्रॅक्टरवर जेवण वाटण्यात आले.
तेलंगनातील २०० विद्यार्थ्यांना लंगर
या वेळी बोर्डाचे सचिव स. रवीन्द्रसिंघ बुंगाई, व्यवस्थापन समिती सदस्य देवेंद्रसिंघ मोटरावाले, स. सुरिंदरसिंघ मेंबर, अवतारसिंघ पहरेदार, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा, स. रवीन्द्रसिंघ कपूर, स. केहरसिंघ, हरमिंदरसिंघ मदतगार, कुलतारसिंघ दफेदार व अन्य लंगर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले. तसेच तेलंगाना येथील रहिवाशी असलेल्या आणि अडकलेल्या दोनशे विद्यार्थ्यांना लंगर जेवण देण्यात आले. गुरुद्वारा बोर्ड नेहमीच आपात परिस्थितीत शहरातील गरिबांच्या मदतीला धावून येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.