हिंगोली : हिंगोली, नांदेड, यवतमाळ जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या इसापूर धरणाचा पाणीसाठा ६५ टक्क्यांपेक्षा अधिक, तर सिद्धेश्वरचाही पाणीसाठा ६४ टक्के झाला असल्याने आता दोन्ही धरणांतून एक लाख ६७ हजार हेक्टर शेती सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. या परिस्थितीत सिंचनासाठी सहा पाणी पाळ्या देता येणार असल्याचे ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.