Killari Earthquake 1993 : स्वप्नकंपाची तीस दशके ! दहा हजार कुटुंबांचे स्थलांतर झाल्याची भीती

गेल्या तीस वर्षांत वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांचे ना संशोधन झाले ना या भागाचा शाश्वत विकास झाला.
Killari Earthquake
Killari Earthquakeesakal
Updated on

लातूर : लातूर जिल्ह्यात किल्लारी परिसरात भूकंप होऊन आज तीस वर्ष झाली. भूकंपानंतर मदतीचे हजारो हात धावून आले. यातून देशाला आपत्ती व्यवस्थापनाचा आदर्शही या भूकंपाच्या पुनर्वसनाने दाखवून दिला. पण पुढे काय, हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. या भागात गेल्या तीस वर्षांत वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांचे ना संशोधन झाले ना या भागाचा शाश्वत विकास झाला.

हाताला काम नसल्याने गेल्या तीस वर्षांत दहा हजार कुटुंब पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांसारख्या शहरांत स्थलांतरित झाली आहेत. या वास्तवाबाबत यंत्रणेमध्ये उदासीनता दिसून येत आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी भूकंपग्रस्तांना तर आधार दिलाच; पण जागतिक संस्था, स्वयंसेवी संस्थांची मदत घेत आपत्ती व्यवस्थापन कसे कसे केले जाते, हे देशाला दाखवून दिले.

पण त्यानंतर पहिली सहा वर्षे या भागात भूकंपाचे अनेक धक्के बसले. पण त्याची नोंद येथे होत नव्हती. येथे भूकंपमापक केंद्र स्थापल्यानंतर १९९९ पासून भूकंपाच्या नोंदी होऊ लागल्या. मागील २४ वर्षांत या भागात भूकंपाचे १२५ पेक्षा अधिक धक्के बसले आहेत.

येथे दरवर्षी भूकंपाचे धक्के बसतात. असे असतानाही मागील तीस वर्षांत या भागात संशोधन होऊ शकलेले नाही. आजही भूकंपाचा धक्का इथे बसला की दिल्लीतून त्याची माहिती मिळाल्यानंतरच किती रिश्टर स्केलचा धक्का आहे, हे सांगितले जाते.

इतकी उदासीनता शासकीय पातळीवरची आहे. भूकंपाच्या वेळी अंगणात खेळणारी मुले आज हाताला काम मागत आहेत. या भागात गेल्या तीस वर्षांत शाश्वत विकासाचे पाऊल पडले नाही. हा भाग शेतीशी निगडित असलेला भाग आहे.

Killari Earthquake
Latur News : जलसाक्षरता रॅलीतून जनतेची दिशाभूल-अशोकराव पाटील निलंगेकर

दरवर्षी किमान आठशे ते हजार टन द्राक्ष येथून आखाती देश, युरोप, ब्रिटन अशा भागात जातात. डाळिंब, केळीसाठी देखील काही भाग प्रसिद्ध आहे. असे असताना या भागात एकही प्रक्रिया उद्योग उभारू शकला नाही. शासनाने भूकंपग्रस्तांच्या शाश्वत विकासासाठी कमी पाण्यावरचे उद्योग येथे सुरु करण्याची गरज आहे. तरच येथून स्थलांतरित होणारे लोक थांबणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.