पोलीस दलातील मनसबदारी काढुन घेण्याची गरज!

एका बाजूला पोलीसांवर गावगुंड हल्ले करतात, तर पोलीसांच्या नाकावर टिच्चून दरोड्यासह चोऱ्या व घरफोड्या राजरोस सुरु असल्याचे चित्र आहे.
Police
Policesakal
Updated on

उस्मानाबाद : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात तडकाफडकी बदली केल्याने दरोडा प्रकरणाची चांगली दखल वरिष्ठांनी घेतल्याचे बोलले जात आहे. शिवाय शहर व आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकापैकी एकावर आज अशाच प्रकारे बदलीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. कुंपनच शेत खात असल्याची चर्चा गेली काही दिवस पोलीस दलामध्ये सुरु असल्याने अखेर त्याला पुष्टी मिळत आहे. पोलीस दलाचा कारभार म्हणजे 'बैल गेला, आणि झोपा केला' अशी झाली आहे. एका बाजूला पोलीसांवर गावगुंड हल्ले करतात तर पोलीसांच्या नाकावर टिच्चून दरोड्यासह चोऱ्या व घरफोड्या राजरोस सुरु असल्याचे चित्र आहे. (Its Time To Break Monopoly In Osmanabd Police)

Police
माझी आणि अंबादास दानवेंची बरोबरी होणे शक्य नाही - चंद्रकांत खैरे

चोर व अवैध धंदेवाल्याचा सुकाळ आल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे तर सामान्य माणुस मात्र भितीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहे. या सर्व परिस्थितीचा विशेष पोलीस (Police) महानिरीक्षक यांना अंदाज आल्याने तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा पहिला बळी एलसीबीचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे ठरले आहेत. अजूनही काही पोलीस निरीक्षक कारवाईच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे. एक ते दोन दिवसांत पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल होण्याचे संकेत या कारवाईवरुन मिळत आहेत. पोलीस अधीक्षकांच्या समोर असलेले हे आव्हान कसे पेलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राजरोसपणे सुरु असलेल्या चोऱ्याकडे दुर्लक्ष केल्यानेच चोरट्याने थेट दरोड्यासारखे प्रकार सुरु केल्याचे दिसुन येत आहे. शिवाय काही ठिकाणी वसूली मोहीम जोरात सुरु झाल्याची चर्चा असुन त्यामुळेच अशा ठिकाणी असलेली मनसबदारी काढुन घेणे गरजेचे ठरलेले आहे.

Police
LPG Cylinder : आता मिस्ड काॅलवर मिळेल गॅस सिलिंडर, जाणून घ्या कसे ?

एलसीबी तर सगळ्यासाठी हवे असलेले ठिकाण असुन त्या माध्यमातून समांतर यंत्रणा राबविता येते. जिल्ह्यामध्ये (Osmanabad) होत असलेल्या अनेक गोष्टींवर यामुळे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आलेल्या अधिकाऱ्यांकडुन होत असतो. त्यातही पोलीस अधीक्षकांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीलाच ही जागा मिळत असते, आता त्याच जागेवरील माणुस बदलण्याची वेळ आल्याने निश्चितपणे पोलीस अधीक्षकांनाही विचार करायला लावला आहे. येत्या काही दिवसांत पोलीस दलामध्ये कसे फेरबदल होतात हे पाहावे लागणार आहे. शिवाय त्यातून पुढे काही चांगले बदल होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()