जालना : 'अवैध दारू' विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका

ठिकठिकाणी एक लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Jalna Action against illegal liquor
Jalna Action against illegal liquorsakal
Updated on

जालना : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका लावला. यात जालना शहर, मंठा, अंबड तालुक्यातील गुरुवारी छापे टाकून एक लाख ४१ हजार रुपयांचा अवैध दारू व इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी जालना शहरातील कैकाडी मोहल्ला येथे तीन हातभट्ट्यांवर छापे टाकले. यावेळी १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच मंठा तालुक्यातील माळतोंडी पाटी येथे एक दुचाकी व देशी दारूचे दोन बॉक्स जप्त केले. अंबड रोड येथे ही एक दुचाकी व देशी दारूचे दोन बॉक्स जप्त केले आहेत. शिवाय पाचनवडगांव येथे दोन हातभट्टीवर छापे टाकून १५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या विविध कारवायांमध्ये १९२ देशी दारुच्या सीलबंद बाटल्या, ३५ लीटर गावठी दारू, एक हजार लीटर रसायन, दोन दुचाक्या असा एकूण एक लाख ४१ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एम.एन.झेंडे, एस. ए. गायकवाड, आर. एन. रोकडे, दुय्यम निरीक्षक पी. बी. टकले, ए. ए. महिंद्रकर, अभय औटे, जवान एस.जी.कांबळे, ए. आर. बिजुले, विजेंद्र पवार, एस.टी. डहाळे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()