भोकरदन तालुक्यातील शेलुद गावातील पानंद रस्ते शिव रस्त्यांचे कामे तात्काळ करण्यात यावे या मागणीसाठी शेलुद येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी ता.२० रोजी होणाऱ्या विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेऊन तसे निवेदन भोकरदन तहसीलदार व निवडणूक विभागाला दिले होते.
त्याची दखल घेऊन तात्काळ प्रशासनाने त्या ग्रामस्थांशी संपर्क साधला व ता.१८ सोमवारी चर्चा करून रस्त्याची कामे तात्काळ मार्गी लावल्या जातील संबंधित विभागाला तसे कळविले जाईल असे लेखी आश्वासनाचे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दयानंद जगताप यांनी दिल्यानंतर शेलुद च्या ग्रामस्थांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेतला .
शेलुद येथील ग्रामस्थ व शेतकरी पंडितराव पुंडलिकराव बारोटे, विजयसिंह पवार, शरद बारोटे कडूबा बारोटे, संपत जयवंत बारोटे व कृष्णा पवार यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिनांक एक नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन त्यांच्या गावातील शेत रस्ते असलेल्या शेलुद गावापासून ते धामणा धरण पॉईंट ते हिसोडा रस्ता शिव पानंद रस्ता