जालना : जालना शहरात रोज वाढत असलेल्या रुग्णांमुळे चिंता वाढत आहे. बुधवारी (ता.एक) शहरातील तीन कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात गुरुवारी (ता.दोन) सकाळी तब्बल चाळीस संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मोठा धक्का बसला असून जिल्ह्यातील एकुण बाधितांचा आकडा आता सहाशे पार झाला आहे.
मंगळवारी सकाळी सलग दोन आणि बुधवारी तीन अशा पाच कोरोना बाधित रुग्णांचा दोन दिवसात मृत्यू झाल्याने बळींची संख्या अठरा झाली. तर सातत्याने भर पडत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांमुळे एकुण बाधितांचा आकडा ६२१ झाला आहे.
कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १५६ संशयितांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल सकाळी आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यात तब्बल चाळीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे. बाधित रुग्णामध्ये सर्वाधिक रुग्ण हे जालना शहरातील आहे.
जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे एकूण बाधितांचा आकडा आता ६२१ झाला आहे. त्यापैकी ३६० रूग्ण बरे झाले आहे. तर अठरा रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या कोविड हॉस्पीटलमध्ये २४३ रूग्णांवर उपचार सुरू आहे. सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णांमध्ये घनसांवगी शहरातील दोन तर उर्वरित ३८ रूग्ण हे जालना शहरातील विविध भागातील असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
जालना कोरोना मिटर
एकुण बाधित ६२१
उपचार सुरू २४३
बरे झाले ३६०
मृत्यू १८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.