Jalna Crime News : रस्त्यात अडवून वाईन शॉपीच्या मॅनेजरवर गोळीबार; आरोपी फरार

crime News
crime News
Updated on

अंबड (जालना) : जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील एक वाईन शॉपीचे मॅनेजर यांना अंबड-मार्डी रस्त्यावर अडवून लूटमारी करण्याच्या उद्देशाने एका अज्ञात इसमाने गावठी पिस्तुलमधून गोळी झाडून गंभीर जखमी केले.

crime News
Ahmednagar : पाऊस लांबल्याने हातावर पोट भरणार्‍याचे हाल! मजुरांना लिंबोळ्याचा आधार

याबाबत सविस्तर माहिती अशी की,तालुक्यातील किनगाव येथील राधाकिसन पिवळ हे अंबड शहरातील एका वाईन शॉपिंध्ये मॅनेजर म्हणून नौकरी करतात.शनिवारी(ता.24)रात्री नेहमी प्रमाणे वाईन शॉपी बंद करून आपल्या मूळ किनगावाकडे दुचाकी क्रमांक एम.एच.21 बी.बी.7028 वरून जात होते.

त्याचवेळी अंबड ते मार्डी रोडवर रात्री पावने दहा वाजेच्या दरम्यान शिवाजी चव्हाण यांच्या शेताजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन इसमानी पवळ यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र झालेल्या झटापटीत पिवळ यांनी बॅग सोडली नाही.यावेळेस अज्ञात इसमाने गावठी पिस्तुलमधून गोळी झाडल्याने राधाकिसन पिवळ हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळावरून अज्ञात इसमाने तात्काळ पलायन केले.

crime News
Mumbai Rain : तोच 'परिवार' मुंबईकरांचा खरा गुन्हेगार! शहरातील गटरी तुंबताच भाजपचा हल्लाबोल

लुटमारीच्या प्रयत्नातून प्रकार घडल्याची शक्यता आहे. मात्र पिवळ यांच्या बॅगमध्ये केवळ जेवणाचा रिकामा डब्बा होता. यामुळे चोरट्याच्या हाताला काही लागले नाही. मात्र राधाकीसन पिवळ यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला गोळी लागली आहे. त्यांच्यावर संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक चैतन्य कदम,सहाय्यक पोलिस निरीक्षक साजिद अहमद यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. याप्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात दोन इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजेद अहेमद हे करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.