Jalna News : जालना जिल्हाधिकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली; शासकीय कामकाजात गतिमानता

शासकीय कामकाजात आता येतेय गतिमानता
jalna dc e office technology digital secured documents
jalna dc e office technology digital secured documents sakal
Updated on

जालना : जिल्हाधिकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे शासकीय कामकाजात सुसूत्रता आली असून निर्णय प्रक्रिया गतिमान व सुलभ झाली आहे. ई-ऑफिसच्या माध्यमातून आतापर्यंत दोन हजारांपेक्षा जास्त टपालपत्रांवर जलदगतीने कार्यवाही करण्यात आली आहे.

शासकीय कामात गतीमानता आणण्यासाठी राज्य शासनाने मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात ता.एक एप्रिलपासून ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

jalna dc e office technology digital secured documents
Jalna News : ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी; निवडणूक आयोगाकडून नऊ तज्ज्ञ अभियंत्यांचे पथक

जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होणारे टपाल मध्यवर्ती नोंदणी कक्षात (सीआरयु) जमा झाल्यानंतर ते टपाल ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून संबंधित विभागाकडे पाठविले जाते. प्राप्त होणारे सर्व टपालाचे स्कॅनिंग करून त्यांच्या नोंदी या प्रणालीमध्ये घेतल्या जातात.

यामुळे दस्तावेज सुरक्षित ठेवण्यास मदत होत आहे. शिवाय कागदविरहित (पेपरलेस) कामकाज होत असल्याने कागदाचा वापर कमी झाला आहे. मध्यवर्ती नोंदणी कक्षात प्राप्त झालेले टपाल व मेल यांचा साप्ताहिक गोषवारा ठेवण्यासाठी रजिस्टर ठेवण्यात आले आहे.

jalna dc e office technology digital secured documents
Jalna Rain Update : जालन्यात तासभर जोरदार पाऊस; दिवसभर अधूनमधून रिमझिम सरी; छत्री, रेनकोटचा वापर सुरू

संबंधित विभागाकडे पाठविण्यात आलेल्या टपालावरही ई-ऑफिसच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येते. या प्रणालीमुळे आलेल्या टपालावर जलद गतीने कार्यवाही होत असल्याने नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होत आहेत.

आजपर्यंत दोन हजारांपेक्षा प्राप्त टपालांवर कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच या ई-ऑफिस प्रणालीमुळे पारदर्शकतेसोबतच दस्तावेज व माहिती सुरक्षित ठेवण्यास मदत झाली आहे. याशिवाय या प्रणालीमुळे वेळेत कामे होत असल्याने सर्वसामान्यांच्या कामांचा त्वरेने निपटारा होत आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.