Drought
DroughtSakal

Drought : संपूर्ण जालना जिल्हाच दुष्काळग्रस्त

यंदा पावसाने पाठ फिरवल्याने राज्य शासनाकडून ऑनलाईन अहवालानुसार जालना जिल्ह्यातील आठ पैकी पाच तालुक्यात पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहिर केला होता.
Published on

जालना - यंदा पावसाने पाठ फिरवल्याने राज्य शासनाकडून ऑनलाईन अहवालानुसार जिल्ह्यातील आठ पैकी पाच तालुक्यात पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहिर केला होता. तर तीन तालुके या दुष्काळी यादीतून वगळण्यात आले होते.

त्यामुळे परतूर, घनसावंगी आणि जाफराबाद तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत होते. अखेर राज्य शासनाने या तीन तालुक्यांचा ही दुष्काळी यादी सामाविष्ट केला आहे. त्यामुळे आता संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त असल्याचे राज्य शासनाकडून जाहिर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात यंदा अल्प पाऊस झाला. वार्षिक सरासरीपेक्षा ही पावसाची टक्केवारी ही कमी असल्याने जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पात पुरेसा जलसाठा झाला नाही. त्यामुळे पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले असून पुढील वर्षातील जुन महिन्यात पावसाळा सुरू होईपर्यंत तब्बल साडेतीनशे गावात पाणी टंचाई निर्माण होणार असल्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे.

दुसरीकडे जिल्ह्याची अनेवारी ही पन्नास पैशांच्या आत असताना आठ तालुक्यांपैकी केवळ जालना, बदनापूर, अंबड, भोकरदन आणि मंठा हे पाच तालुके जुन ते जुलै आणि ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अल्प पावसाच्या अकडेवारीसह इतर ऑनलाईन अहवालानुसार दुष्काळी तालुके म्हणून जाहिर केले होते. मात्र, घनसावंगी, परतूर आणि जाफराबाद हे तीन तालुके दुष्काळातून वगळण्यात आले होते.

मात्र, घनसावंगी, परतूर आणि जाफराबाद हे तीन तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने या तालुक्यांचा ही दुष्काळीत समावेश करण्याची मागणी जोर धरत होती. शिवाय जिल्हा प्रशासनाकडून या तीन तालुक्यातील अतिरिक्त माहिती संकलन करून ठेवली होती.

परिणामी राज्य शासनाकडून दुसऱ्या टप्प्यातील यादीमध्ये शासन निर्णय काढत घनसावंगी, परतूर आणि जाफराबाद हे तीन तालुक्यांचा दुष्काळी जिल्ह्यात समावेश केला आहे. त्यामुळे आता संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर झाला आहे.

जिल्ह्यात केल्या जाणार दुष्काळ उपाययोजना

जिल्ह्यातील आठ तालुक्यात आता राज्य शासनाकडून दुष्काळ जाहिर केला आहे. त्यामुळे पाणी टंचाई दुर करण्यासाठी टॅंकर सुरू करणे, मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार हामीचे कामे सुरू करणे, शैक्षणिक शुल्कात माफी, पिककर्जाचे पुनरगठण करणे, पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देणे किंवा गरज भासल्यास चारा छावण्या सुरू करणे आदी उपायोजना केल्या जाणार आहे.

राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील पाच ताालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर केले होते. तर दुसऱ्या टप्प्यात अध्यादेश काढुन उर्वरित घनसावंगी, परतूर आणि जाफराबाद हे तीन तालुके ही दुष्काळग्रस्त जाहिर केले आहेत.

- केशव नेटके, निवासी उपजिल्हाधिकारी, जालना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.