जालना - गणेशोत्सवात आपले वेगळेपण जपत आलेल्या श्री अनोखा गणेश मंडळातर्फे यंदा तब्बल १०७ किलो वजन असलेल्या चांदीची साडेपाच फूट उंचीच्या बाप्पांच्या मूर्तीची मंगळवारी ( ता. १९) स्थापन केली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या श्री अनोखा गणेश मंडळाच्या वतीने यंदा प्रथमच ऐतिहासिक चांदीची गणपती बाप्पांची मूर्ती तयार करण्यात आली. सायंकाळी रुपम हॉल येथे आमदार कैलास गोरंट्याल, माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, युवा नेते अक्षय गोरंट्याल, मंडळाचे अध्यक्ष अनिल गोयल, योगेश मानधनी, कार्याध्यक्ष संजय अग्रवाल, संस्थापक अध्यक्ष अजय भरतिया, उद्योजक राहुल किशोर अग्रवाल यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी आयुक्त संतोष खांडेकर, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, सुनील आर्दड, मनोज महाराज गौड, किशोर तिवारी, सिव्हिल क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाश मंत्री, रामनिवास मानधनी, सतीश पंच, रमेश तोतला अनिल पंच, दीपक भुरेवाल, राजेश सोनी, नरेंद्र अग्रवाल, केदार मुंदडा यांची उपस्थिती होती. फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजीसह वाद्यांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया... असा जयघोष करण्यात आला. आमदार श्री. गोरंट्याल यांनी सहकुटुंब आरती केली. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे , प्रशिक्षणार्थी पोलिस उपविभागीय अधिकारी चैतन्य कदम यांनी भेट देऊन गणपती बाप्पांचे पूजन केले.
स्वप्नपूर्तीनंतर कायमस्वरूपी दर्शन
अनोखा गणेश मंडळातर्फे चांदीची मूर्ती बनवणे ही बऱ्याच दिवसांपासून संकल्पना होती. मंडळाचे अध्यक्ष अनिल गोयल, योगेश मानधनी व सर्व सदस्यांनी गतवर्षी तत्काळ होकार देत आपल्या संकल्पनेला मूर्त रूप दिले. खामगाव येथील विश्वकर्मा यांच्याकडून ही १०७ किलो चांदीची मूर्ती तयार करून घेतली आहे. गणेशोत्सवानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भाविकांना कायमस्वरूपी दर्शन व्हावे, यासाठी मंडळाचे प्रयत्न आहेत, असे संस्थापक अध्यक्ष अजय ऊर्फ जगदीश भरतिया यांनी नमूद केले.
अनोखा गणेश मंडळाने दरवर्षी लक्षवेधी, आकर्षक देखावे, सामाजिक उपक्रम राबवून जालन्यातील गणेशोत्सवास वेगळ्या उंचीवर नेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशात आतापर्यंत न झालेली १०७ किलो वजनाची चांदीची मूर्ती तयार करून अनोखाने एक इतिहास रचला. आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंद घेण्यासारखा आहे. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही अनोखा मंडळाने धडाकेबाज साजरा करावा अशी अपेक्षा.
कैलास गोरंट्याल, आमदार, जालना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.