Jalna : चोरांचे हात आता मूर्तीपर्यंत...

मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर
Jalna jamb samarth temple theft
Jalna jamb samarth temple theft
Updated on

कुंभार पिंपळगाव : मंदिर फोडून आतील दानपेट्या, घंटा चोरीच्या घटना तशा अनेक भागात घडतात, मात्र आता चोरांचे हात मूर्तीपर्यंत पोचत आहेत. अनेक मंदिरात सुरक्षा रक्षक नाहीत आणि सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत. त्यामुळे मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामींच्या पूर्वजांचे देवघर समजल्या जाणाऱ्या जुन्या ऐतिहासिक मंदिरातील सातशे ते साडेसातशे वर्ष पुरातन विविध मूर्ती चोरट्याने रविवारी (ता.२१) रात्री चोरून नेल्या होत्या. या चोरीनंतर गाव परिसरातील विविध धार्मिक स्थळावरील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

गावासह परिसरात अनेक मोठी देवस्थाने आहेत. या देवस्थानांचे मोठे महत्त्व आहे. अनेक ठिकाणी विविध धार्मिक उत्सव, मोठ्या यात्रा होतात, मंदिरांना बऱ्यापैकी उत्पन्नही आहे, मात्र अनेक ठिकाणी मंदिरात सुरक्षारक्षक नाहीत. मंदिरे दिवसभर उघडी राहतात तर रात्रीच्या वेळेला लोखंडी गेटही नाहीत, सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. मंदिरात मोठमोठ्या दानपेट्या असतात. अनेक ठिकाणी दानपेट्या फोडून रक्कम पळविण्याच्या घटनाही घडल्या आहेत. अनेक मंदिरात सोन्या- चांदीसह रोख रक्कम असते हे दागिणे विविध बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवून समारंभ,उत्सवालाच काढले जातात. काही ठिकाणी नेहमी दागिणे घातले जातात.

अनेक मंदिरात हजारो, शेकडो वर्षापूर्वीच्या जुन्या मूर्ती आहेत. काही मूर्तींना सोन्याचांदीचे नाक, डोळे,कान त्याचप्रमाणे गदा, दागिणे आहेत. चोरीच्या घटना घडल्या की विषय भावनिक होतो. ग्रामीण भागात नेहमीच विजेचा लपंडाव असतो. त्यामुळे सौरऊर्जा, उच्च दर्जाचे इन्व्हर्टर, पर्यायी प्रकाश व्यवस्थेचा अभाव अशा कितीतरी गोष्टी ऐरणीवर आल्या आहेत. मंदिर समिती, ग्रामस्थांनी याबाबत आता लक्ष देण्याची गरज आहे.

काय करता येईल...

  • पुरातन मंदिर परिसरात सुरक्षा रक्षकाची नेमणूक

  • परिसरात सीसीटिव्ही कॅमेरा बसविणे

  • मंदिराच्या मुख्य दरवाजाला लोखंडी ग्रील

  • मंदिर परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था

  • मंदिरातील दागिने बँक लॉकरमध्ये ठेवणे

  • हलविता येणार नाही अशी दानपेटी बसविणे

परिसरात विविध धार्मिक स्थळ आहेत. या ठिकाणी अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत. सुरक्षारक्षकही नाहीत, यामुळे मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्‍न आहे. विविध मंदिरात मौल्यवान वस्तु, पैसे, जुन्या मूर्तींचा ठेवा आहे. हा वारसा जपण्यासाठी मंदिर समितीसह ग्रामस्थांनी लक्ष देण्याची गरज आहे.

- प्रशांत महाजन, पोलिस निरीक्षक, घनसावंगी

बहुतांशी मंदिरे तीर्थक्षेत्र विकासामध्ये आहेत, शासनाने यासाठी सुरक्षा पुरवावी. चांगले उत्पन्न असणाऱ्या मंदिरांनी विश्‍वस्तांमार्फत सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी. मंदिराच्या सुरक्षेला धोका पोहचणार नाही यासाठी सर्वांनी एकजुटीने काळजी घ्यावी. मंदिर समितीच्या वस्तु, पैसे,दागिणे बॅंकेच्या लॉकरमध्येच राहावेत. ते विश्‍वस्त किंवा ठरावीक व्यक्तींकडे राहू नयेत. प्रत्येक मंदिराचे बॅंकेत खाते असावे. जुन्या वस्तूंचा ठेवा,ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी ग्रामस्थांचेही सहकार्य गरजेचे आहे.

- महंत गणेशानंद महाराज सरस्वती, तुळजाभवानी संस्थान, राजाटाकळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.