OBC March: जालन्यात ओबीसींचा विराट मोर्चा; जानकर, बावनकुळेंसह महिलांचा लक्षणीय सहभाग

OBC March Jalna
OBC March Jalna
Updated on

जालना : वर्ष २०२१ च्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यासाठी रविवारी (ता.२४) जालन्यात विशाल ओबीसी मोर्चा काढण्यात आला. तसेच मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करून करण्यात आली.

या मोर्चात ओबीसी नेते ही सहभागी झाले होते. यात महादेव जानकर, आमदार नारायण कुचे, विकास महात्मे, चंद्रशेखर बावनकुळे,  खासदार भागवत कराड, आमदार राजेश राठोड आदी नेत्यांनी मोर्चात सहभाग घेतला. या ओबीसी मोर्चात सुमारे एक लाखांपेक्षा अधिक समाज बांधव सहभागी झाल्याचे चित्र आहे. ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी, एसबीसी समाजाची २०२१ मध्ये जातीनिहाय जनगणना करावी, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, असंवैधानिक नॉन क्रिमिलिअरची अट रद्द करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना एससी., एस.टी., विद्यार्थ्यांप्रमाणे शंभर टक्के स्कॉलरशिप द्यावी.

राज्यातील प्रत्येक शासकीय व निमशासकीय आस्थापनांमध्ये झालेल्या दोषपूर्ण बिंदू नामावलींची चौकशी करून नव्याने बिंदू नामावली तयार करावी, मंडळ आयोग लागू होऊनही केंद्र व राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये ओबीसी समाजाला २७ टक्के  प्रतिनिधित्व मिळाले नाही. हा बॅकलॉग तत्काळ भरावा, ओबसी अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोउन्नतीमध्ये आरक्षण मिळावे. ओबीसी, भटके विमुक्त व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तालूका स्तरावर निवासी वसतिगृहाची उभारणी करा, महाज्योतीला दोन हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधन्यासाठी हा मोर्चाचे काढण्यात आला.

हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काद्राबाद, पाणीवेस, मस्तगड, गांधी चमन, टाऊनहॉल, शनिमंदिर चौक, उड्डाण पुल, नूतन वसाहत मार्गे अंबड चौफुली येथे दाखल झाला.

पारंपारिक वेशभूषाने वेधले लक्ष
या ओबीसी मोर्चात झालेल्या ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी, एसबीसी समाज बांधवांनी पारंपारिक वेशभुषेत सहभागी झाले होते. त्यामुळे जालनेकरांचे लक्ष या मोर्चाने वेधले. दरम्यान विविध घोषांनानी जालना शहर दुमदुमन निघाले होते.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.