Jalna : मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी यंदा वाढले इच्छुक

उमेदवारी दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस
Mantha
Manthasakal
Updated on

मंठा : सध्या मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे. त्यातच जागा कमी असल्या तरी अनेकजण बाजार समितीची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे निवडणुकीत यंदा चुरस राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी (ता.तीन) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

बाजार समितीसाठी यंदा विविध पक्ष मैदानात उतरले आहेत. युती, महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडी सर्व जागा लढविणार असे त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सध्या तरी जाहीर केले आहे. त्यानुसार प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी उमेदवाराची चाचपणी केली. युती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत.

बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागा असून प्रत्येक पक्षात निवडून येण्याची क्षमता असणारे जास्त आहेत. पक्षातर्फे मोजक्याच इच्छुक कार्यकर्त्यांना संधी मिळणार तर काही जणांची निराशा होणार आहे. त्यामुळे युती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी मध्ये संधी न मिळाल्यास अनेक जण अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. इच्छुकांना समजावून सांगा, ऐकले नाही तर उमेदवारी अर्ज दाखल करू द्या, नंतर तडजोडीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता बोलू असा सबुरीचा सल्ला देखील काही नेते इच्छुक कार्यकर्त्यांना देत आहेत.

Mantha
Jalna : ...तर गुरुजींच्या पदालाही कात्री, विद्यार्थ्यांच्या आधारकार्डचे शिक्षकांना टेन्शन

दोन हजार २४३ मतदार

बाजार समितीच्या १८ जागांकरिता एकूण मतदार २ हजार २४३ आहेत. त्यात सहकारी संस्था मतदार संघात ५२० मतदार, ग्रामपंचायत मतदार संघात ७२९ मतदार, व्यापारी मतदार संघात ६८८ मतदार व हमाल मापाडी मतदार संघात ३०६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय भोईटे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मधुकर राठोड यांनी दिली आहे.

बुधवारी होईल छाननी

दरम्यान, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा सोमवारी (ता.तीन) शेवटचा दिवस आहे. तर बुधवारी (ता.पाच) सकाळी अकरा वाजेनंतर नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येईल. छाननीनंतर वैध नामनिर्देशनपत्रांची ता.सहा एप्रिलला यादी प्रसिद्ध होईल.

ता.सहा एप्रिल ते २० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. ता.२१ एप्रिलला सकाळी अकरा वाजेनंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप निवडणूक अधिकारी सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात करतील. निवडणुकीसाठी रविवार, ता.३० एप्रिलला मतदान व त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.

Mantha
jalna crime news : जालन्यात तलवारीचा साठा जप्त ; दोन संशयित पकडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.