जालना : तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून शिक्षकांसाठी प्रेरणा परीक्षा रविवारपासून (ता. ३०) सुरू झाली आहे. मात्र, पहिल्या दिवसापासून या प्रेरणा परीक्षेला शिक्षकांचा नकारघंटा होता. नोंदणी केल्यानंतरही बहुतांश शिक्षकांनी परीक्षेला दांडी मारली आहे.
रविवारी केवळ २७७ शिक्षकांनी प्रेरणा परीक्षेचा पेपर दिला. त्यामुळे दांडीबहाद्दर शिक्षकांकडून विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यावा असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शिक्षकांच्या प्रेरणा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. ही प्रेरणा परीक्षा ऐच्छिक होती.
जिल्हा परिषद शिक्षकांसह अनुदानित, विनाअनुदानित शिक्षकांनी या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यात जिल्हा परिषद शिक्षकांना ऑनलाइन नोंदणीत परीक्षेसाठी होकार किंवा नकार दर्शवणे बंधनकारक होते.
जिल्ह्यात हजारो शिक्षक असताना केवळ एक हजार ४७५ शिक्षकांनी या प्रेरणा परीक्षेसाठी होकार दर्शवला होता. त्यामुळे शिक्षकांकडून या प्रेरणा परीक्षेला पहिल्या दिवसांपासून नकार असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.
दरम्यान रविवारी शहरातील पाच केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. यात भौतिकशास्त्र पेपरला २७७, रसायनशास्त्र पेपरला २७१ आणि जीवशास्त्र पेपरला २७० शिक्षकांची उपस्थिती होती. त्यामुळे नोंदणी नोंदणी करूनही बाराशेपेक्षा अधिक शिक्षकांनी परीक्षेला दांडी मारण्याची ‘प्रेरणा’ दाखवून दिली आहे. परिणामी या प्रेरणा परीक्षेचा उद्देश अपूर्ण राहिल्याचे पाहण्यास मिळत आहे.
केंद्रनिहाय प्रेरणा परीक्षेतली भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरची स्थिती
परीक्षा केंद्र शिक्षक उपस्थिती शिक्षक अनुपस्थिती
अंकुशराव टोपे महाविद्यालय ५२ २८३
उर्दू हायस्कूल ६१ १७४
नूतन विद्यालय ३७ २९९
श्री सरस्वती भुवन प्रशाला ४५ २५४
सीटीएमके गुजराती विद्यालय ८२ १८८
एकूण २७७ १,१९८
रसायनशास्त्र विषयाच्या पेपरची स्थिती
परीक्षा केंद्र शिक्षक उपस्थिती शिक्षक अनुपस्थिती
अंकुशराव टोपे महाविद्यालय ४९ २८६
उर्दू हायस्कूल ६१ १७४
नूतन विद्यालय ३७ २९९
श्री सरस्वती भुवन प्रशाला ४४ २५५
सी टी एम के गुजराती विद्यालय ८० १९०
एकूण २७१ १,२०४
जीवशास्त्र विषयाच्या पेपरची स्थिती
परीक्षा केंद्र शिक्षक उपस्थिती शिक्षक अनुपस्थिती
अंकुशराव टोपे महाविद्यालय ४९ २८६
उर्दू हायस्कूल ६१ १७४
नूतन विद्यालय ३७ २९९
श्री सरस्वती भुवन प्रशाला ४४ २५५
सी टी एम के गुजराती विद्यालय ७९ १९१
एकूण २७० १,२०५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.