Jalna Maratha Andolan: गरोदर असलेल्या महिला पोलिसांना वाचवलं तरी.. जखमी महिलेने सांगितली inside स्टोरी

पोलिसांच्या लाठीहल्ल्यात गंभीर जखमी निर्मला तारख यांचा प्रश्‍न
निर्मला तारख
निर्मला तारखsakal
Updated on

माधव इतबारे

Jalna News - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आम्ही कुटुंबासह आंदोलनात सहभागी झालो होतो. शांततेत आंदोलन सुरू असताना अचानक पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यात माझ्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, १५ टाके पडले आहेत. पोलिसांनी रस्ते बंद केल्यामुळे दवाखान्यात पोचण्यासाठी दोन तास लागले.

आमचे रक्त सांडले, आता तरी मुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण देणार का? असा प्रश्‍न लाठीहल्ल्यातील गंभीर जखमी, छत्रपती संभाजीनगर येथे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या निर्मला तारख यांनी केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून निर्मला तारख, त्यांचे पती विजय, सासू अलकाबाई व मुलगा असे सर्वजण आंदोलनात सहभागी झाले होते.

निर्मला तारख
Solapur News : आईला स्वत:च्या पोटचा गोळाच विकायचा होता पण...

पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात निर्मला तारख यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, नाकाचे हाड मोडले आहे. त्यासोबत सासू व पती देखील जखमी आहेत. त्यांच्यावर शहरातील गॅलेक्सी सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी घडलेल्या घटनेविषयी त्या म्हणाल्या, आमचे आंदोलन शांततेत सुरू होते. आंदोलनस्थळी भजन, कीर्तन होत होते.

निर्मला तारख
Nanded News : आगारातून आज एकही बस धावणार नाही

मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास सुरवातही केली होती. मग अचानक लाठीहल्ला करण्याचे कारण काय? कोणत्या यंत्रणेचा पोलिसांवर दबाव आला? महिला, लहान मुले, वृद्धांना मारहाण करण्यात आली? असा प्रश्‍न निर्मला तारख यांनी केला. गंभीर जखमी असताना उपचारासाठी जाण्यासाठी रुग्णवाहिका देखील मिळाली नाही.

मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. आमचे रक्त सांडले, आतातरी मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री आम्हाला आरक्षण देऊन न्याय देणार का? उपचाराचे पैसे देऊन आमच्या मनात झालेल्या जखमा भरून निघणार आहेत का? असा संतप्त प्रश्‍न निर्मला तारख यांनी केला. (Latest Marathi News)

निर्मला तारख
Nirmala Sitharaman: भारताच्या अर्थमंत्र्यांचं शिक्षण काय झालय माहितेय का?

चहापाणी देणाऱ्यांनीच ,केली मारहाण

गरोदर पोलिसांना वाचवले ,तरी माझ्यावर लाठीचार्ज केला.

आंदोलन सुरू झाल्यापासून पोलिसांची ये-जा सुरू होती. त्यांना मी चहा, पाणी केले. त्याच पोलिसांनी माझ्यावर लाठीहल्ला केला, अशी खंत निर्मला तारख यांनी व्यक्त केली.

गाड्या जाळल्याचा आरोप चुकीचा

उपोषणाच्या ठिकाणी आम्ही मुलांबाळासह सहभागी झालो होतो, आम्हाला काही गडबड करायची असती तर कोणी कुंटुबासह येते का? असा प्रश्‍न विजय तारख यांनी केला. पोलिसांच्या गाड्या जाळल्याचा आरोप चुकीचा आहे. ग्रामस्थांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी विजय तारख यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.