Jalna News: अंतरवाली सराटीमधील दगडफेक प्रकरणातील प्रमुख आरोपीला अटक; पिस्तुलासह दोन जिवंत काडतुस जप्त

जालन्यातील अंतरवाली दगडफेक प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
Jalna News
Jalna NewsEsakal
Updated on

अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषण स्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली होती. या दगडफेकीच्या घटनेतील आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी बेदरे यांच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

ऋषिकेश बेदरेवर गोंदी पोलीस ठाण्यात कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचा शोध घेत असताना तो इतर 2 साथीदारांसह आढळून आला होता. पोलिसांनी त्यांच्यावर 307 कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Marathi Tajya Batmya)

Jalna News
Uttarkashi Tunnel Rescue: अजूनही सुटका नाहीच! मशीन ठरल्या निकामी, आता मजूर स्वतःच करणार प्रयत्न? दोन योजनांवर विचार सुरू

जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या उपोषणास्थळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर झालेल्या दगडफेकीच्या संदर्भात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडे पोलिसांकडून गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस आढळून आली आहेत.

Jalna News
Rajasthan Election Voting : राजस्थानच्या 199 विधानसभा जागांसाठी आज मतदान; 1,863 उमेदवार रिंगणात, भाजप-काँग्रेसमध्ये 'काटे की टक्कर'

दरम्यान या लाठीचार्ज प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यानंतर या लाठीचार्ज प्रकरणी फडणवीसांनी आदेश दिले नसल्याची माहिती समोर आली होती.(Latest Maharashtra News)

तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर हे पिस्तुल त्यांच्याकडे कसं आलं याचा तपास पोलीस करत आहेत. यासंबधीचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.