Who Is Tushar Doshi
जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी संध्याकाळी हिंसक वळण लागल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे नाव चर्चेत आहे. १० वीपर्यंत धुळ्यात शिकलेल्या तुषार दोशी हे पोलीस दलात का भरती झाले, त्यांची कारकिर्द, शिक्षण याचा घेतलेला आढावा.
तुषार दोशी हे २००१ मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर पोलीस दलात भरती झाले. मी पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिली आणि पोलीस खात्यात भरती झालो, असं तुषार दोषींनी नवी मुंबईत पोलीस उपायुक्तपदी असताना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.
तुषार दोशींचे शिक्षण?
तुषार दोशी यांनी फिजिक्समध्ये पदवी घेतली असून पदवीनंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. तुषार दोशी यांचे वडील हे रायगड जिल्हा परिषदेत नोकरी करायचे.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तुषार दोशींनी सरकारी नोकरीच करायची असा निश्चय केला. इयत्ता ४ थीपर्यंत तुषार दोशींनी रायगडमध्ये शिक्षण घेतले. यानंतर स्कॉलरशिप मिळवत ते धुळ्यातील सरकारी विद्यानिकेतनमध्ये गेले. ११ वीनंतरचे शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले. (Current Jalna SP)
नाशिकमध्ये ट्रेनिंग, चंद्रपूरमध्ये पहिली पोस्टींग
२००१ मध्ये नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तुषार दोशींची पहिली पोस्टींग चंद्रपूरमध्ये करण्यात आली. राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. चंद्रपूरमधील राजुरा नक्षलींचा प्रभाव असलेला भाग होता.
गडचिरोलीतील नक्षलवादी या भागात आश्रय घ्यायचे असे तुषार दोशींनी एका मुलाखतीत सांगितले होते. यानंतर लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई या शहरांमध्ये त्यांनी काम केले. (Jalna Maratha Andolan)
तुषार दोशींनी हाताळलेली बहुचर्चित प्रकरणे
तुषार दोशी हे पुणे पोलीस दलात सायबर विभागात उपायुक्त होते. २०१८ च्या सुमारास नवी मुंबईतील पोलीस उपायुक्तपदी कार्यरत असताना तुषार दोशी एजाज खान अटक प्रकरण, अश्विनी बिद्रे- गोरे हत्याप्रकरणामुळे चर्चेत होते.
अभिनेता एजाज खानला ऑक्टोबर २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. दोशी यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. (संदर्भ- Hindustan Times) या प्रकरणाचा तपास काही दिवसांनी एनसीबीकडे सोपवण्यात आला होता.
तर अश्विनी बिद्रे प्रकरणात तुषार दोशी यांनी आरोपीच्या वकिलांना गोपनीय माहिती पुरवली होती, असा आरोप अश्विनी यांच्या वडिलांनी पत्राद्वारे केला होता. (संदर्भ- टाईम्स ऑफ इंडिया) २०१६ मधील फर्ग्युसन महाविद्यालयातील देशविरोधी घोषणांसंदर्भातील प्रकरणाचा तपासही त्यांनी केला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.