Jalna : मत्स्योदरी देवीची दानपेटी फोडली; अज्ञात चोरट्याने चार ते पाच लाख रुपयांचा ऐवज केला लंपास

कोणीतरी अज्ञात चोरट्याने कटर व इतर साहित्याने मंदिरातील दानपेटी फोडून...
Jalna
JalnaSakal
Updated on

बाबासाहेब गोंटे अंबड

मराठवाड्याचे आराध्य दैवत जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील श्री मत्स्योदरी देवी मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली दानपेटी कटरच्या मदतीने कट करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने शुक्रवारी(ता.21)सकाळी सहा वाजेच्या दरम्यान उघड झाली आहे.

Jalna
Jalana Crime : डुकरे नेण्यावरून एकाचा खून; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील मत्स्योदरी देवी मंदिरात नेहमीप्रमाणे सुहास गुरव हे मंदिरातील लिफ्टच्या कडेला असलेला दरवाजा उघडून मंदिरात गेल्यानंतर देवीच्या मंदिरातील गाभाऱ्याच्या दरवाजाची कुलूप तोडून दान पेटी फोडल्याचे लक्षात आल्यानंतर गुरव यांनी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक कैलास शिंदे यांना सांगितल्यानंतर त्यांनी तहसीलदार तथा संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत शेळके यांनी देऊन अंबड पोलीस ठाण्याला कळविले.

कोणीतरी अज्ञात चोरट्याने कटर व इतर साहित्याने मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम व सोन्या,चांदीचे दागिने यासह आदी ऐवज मिळून चार ते पाच लाख रुपयांवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे.

जालना जिल्ह्यासह मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेल्या अंबड शहरातील श्री मत्स्योदरी देवी मंदिराच्या गाभाऱ्यात असणारी दानपेटी गुरुवारी (ता.20) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्यात असलेली दानपेटी कटरच्या साह्याने फोडल्याची चर्चा मंदिर परिसरात ऐकायला मिळाली.

Jalna
Nag Nagin : नागिनच्या मृत्यूनंतर चक्क नाग देतोय पहारा, अनोखी प्रेमकहाणीचा Video समोर

मंदिरातील दानपेटी फोडल्याच्याघटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक तुषार दोषी,पोलिस उपअधीक्षक चैतन्य कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव,गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्र्वर खनाळ,सहाय्य पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हान,आदिनाथ ढाकणे यांच्यासह आदी घटनास्थळी दाखल झाले होते.श्वानपथक,फिंगर प्रिंट दाखल:मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडल्यानंतर जालना येथून फिंगर प्रिंट व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.

Jalna
Mumbai Orange Alert : मुंबईला उदया पावसाचा ऑरेंज अलर्ट

शहरातील श्री मत्स्योदरी देवीचे मंदिर गाभाऱ्यातील सिसिटीव्ही कॅमेरे तांत्रिक अडचणीमुळे गुरुवारीच बंद पडले असल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.त्यामुळे गाभाऱ्यात अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यास आता पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

मंदिर संस्थानकडून दानपेटी फोडल्याची माहिती

प्रतिक्रिया-

श्री मत्स्योदरी देवी मंदिरात चोरी झाल्याचे मंदिराचे पूजारी गीता विलास खुंठेफळकर यांनी याबाबत माहिती दिली.त्यानंतर पोलिसाना कळविण्यात आले.मंदिराची दानपेटी प्रत्येक सहा महिन्याला मोजली जाते.यामध्ये साधारणपणे चार ते पाच लाखांच्या आसपास रक्कम जमा होत असते. पुढील महिन्यात दानपेटी उघडून मोजली जाणार होती.

चंद्रकांत शेळके तहसीलदार तथा मत्स्योदरी देवी संस्थानचे अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.