Jalna News : रिमझिमनंतर पोळा सणाच्या खरेदीला उत्साह,विविध साहित्यांना मागणी,पावसाच्या उघडीपचे संकट टळले

पोळा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याने शहरी व ग्रामीण भागातील दुकानांत पोळा सणासाठी बैलांच्या सजावटीचे साहित्य तसेच बैलांचे शिंग रंगवण्यासाठी रंग व नारळे
pola
pola sakal
Updated on

सुभाष बिडे

घनसावंगी - मागील काही वर्षांपासून बोंडअळी, परतीचा पाऊस, गारपीट, अतिवृष्टी या नैसर्गिक संकट, कोरोनाचे संकट त्यानंतर यंदा पावसाची उघडीप, मोसंबीसारख्या फळपिकांची गळती अशा अनेक संकटांमुळे शेतकरी हतबल झाला होता.

त्यातच दोन दिवसांत रिमझिम पावसाने सुरवात केल्याने शेतकऱ्यांचा महत्त्वपूर्ण समजला जाणारा पोळा सणात उत्साह वाढल्याने शेतकऱ्यांनी शनिवारी आठवडे बाजारात विविध साहित्यांच्या खरेदीसाठी गर्दी केली होती.

यंदा पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील पिके माना टाकू लागली होती. पिकांचे नुकसान, सिंचन प्रकल्प कोरडे पडले, मोसंबी फळपिकांची गळती हे पाहता यंदा शेतकऱ्यांच्या हाती काही पडणार नसल्याचे दिसत होते. या पार्श्‍वभूमीवर पोळा सणावर दुष्काळाचे सावट दिसत होते.

pola
Pune News : कीर्तनातून प्रबोधन,भजनी मंडळांचाही समावेश

दरम्यान, मागील दोन दिवसांपासून तालुक्‍यात सर्वत्र रिमझिम पावसाने सुरूवत केल्याने खरिपांच्या पिकांना नवजीवन प्राप्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळून पोळा सणाबाबत उत्साह निर्माण झाला आहे.

पोळा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याने शहरी व ग्रामीण भागातील दुकानांत पोळा सणासाठी बैलांच्या सजावटीचे साहित्य तसेच बैलांचे शिंग रंगवण्यासाठी रंग व नारळे, विविध रंगांची माती, खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे.

अशा आहेत किंमती हिरव्या रंगाचे गोंडे दोनशे ते अडीचशे रुपये जोडी, वेसन १००, रेशीम गोफ तसेच गोफ कासरा प्रत्येकी ३००, कवडीमाळ (प्लास्टिक) - दोनशे रुपये, रेशम गोफ घुंगरूमाळ - १०० ते १५०० , शिंगाचे गोंडे १०० ते १५०, रंगबेरंगी झूल - १५०० ते २०००, पैंजण- २५० , म्होरकी १०० ते १५०, बांशिंग गोंडे ७००, पितळी घंटा पाचशे ते आठशे, झुली - १५०० रुपयांप्रमाणे विक्री होत आहे.

pola
Pune Airport : ३० विमाने वाढणार, तर प्रवासी १० हजारांनी वाढणार

गतवर्षी तुलनेत सर्वच वस्तूंमध्ये दहा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. अनेक वर्षापासून पोळा सण अनेक संकटांच्या गर्तेत येतो. परंतू शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला पोळा हा सण हा शेतकऱ्यांची अस्मिता असल्याने कोणतेही संकट असो पोळा सणांविषयीचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. त्यामुळे बैलांच्या सजावटीसह खाण्यापिण्याच्या साहित्यांच्या खरेदीला उत्साह आहे.

- बाळासाहेब बोरकर, शेतकरी, बहिरेगाव

pola
Nagpur News : पोलिसांवर रोखले पिस्तूल, आरोपी फरार

घनसावंगी तालुक्‍यात पावसाने उघडडीप दिली होती. परंतू नुकतेच पावसाने आगमन केल्याने पोळा सण उत्साहात साजरा होण्यासाठी सर्वत्र शेतकऱ्यांत साहित्य खरेदी करताना उत्साह दिसून येत आहे. परंतू मागील दोन वर्षानंतर यंदा बैलपोळ्याच्या साहित्याच्या दरात जळपास तीस टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली आहे. तरीही सजावटीसह अनेक बैलजोडीचे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी परिसरातील आठवडे बाजारासंह दुकानात गर्दी करत आहेत.

- बंडू कुंभकर्ण, व्यापारी, घनसावंगी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()