Jalna News : हलदोला रस्त्यावरील रेल्वे रुळावर रेल्वे रोखण्याचा प्रयत्न, बदनापूर रेल्वे स्थानकावर तासभर रेल्वे थांबवली

अर्थात आंदोलकांनी रेल्वे रुळावरच रेल्वे पोलिसांना निवेदन सादर करून केंद्र व राज्य शासनाने
jalna
jalna sakal
Updated on

बदनापूर - बदनापूर तालुक्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आता पर्यंत रस्त्यावर होणारे आंदोलन आता रेल्वे पर्यंत येऊन ठेपले आहे. तालुक्यातील सेलगाव ते हलदोला रस्त्यावर असलेल्या रेल्वे फाटका जवळील रेल्वे रुळावर सोमवारी (ता. ३०) सायंकाळी रेल्वेगाडी रोखण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांनी केला. मात्र रेल्वे व बदनापूर पोलिसांनी यात हस्तक्षेप करून त्यांना रेल्वे - रोको आंदोलन करण्यापासून परावृत्त केले.

अर्थात आंदोलकांनी रेल्वे रुळावरच रेल्वे पोलिसांना निवेदन सादर करून केंद्र व राज्य शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडविला नाही, तर रेल्वे - रोको आंदोलन देखील करू, असा इशारा दिला आहे. तर रेल्वे प्रशासनाने देखील खबरदारीचा उपाय म्हणून छत्रपती संभाजीनगर - हैद्राबाद जलद रेल्वे साधारण तासभर बदनापूर रेल्वे स्थानकावर थांबवून ठेवली होती.

बदनापूर तालुक्यात मराठा आरक्षणाची धग वाढत चालली आहे. अंतवाली सराटी येथे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे मागील सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यात त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत असल्याने मराठा समाजाचा संयम सुटत चालला आहे. त्याचाच परिपाक म्हणून ठिकठिकाणी मराठा बांधव विविधांगी आंदोलने करीत आहेत.

jalna
Maratha Reservation : अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ॲड. चव्हाण व परळी विधानसभा अध्यक्ष देशमुख यांचा राजीनामा

आता पर्यंत रस्त्यावर होणाऱ्या आंदोलनाने आता रेल्वेगाड्यां पर्यंत आपला मोर्चा वळविला आहे. दरम्यान, रविवारी (ता. ३०) सायंकाळी बदनापूर तालुक्यातील शेकडो मराठा बांधव सेलगाव ते हलदोला रस्त्याला छेदून जाणाऱ्या रेल्वे फाटका जवळील रेल्वे रुळावर एकवटले. मराठा आरक्षणाबाबत शासन गंभीर नसल्याचा आरोप करीत थेट रेल्वे - रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी थेट रेल्वे रुळावर ताबा मिळवत "एक मराठा - लाख मराठा" अशा गगनभेदी घोषणा दिल्या.

घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुदाम भागवत व बदनापूर पोलिसांच्या फौजफाट्यासह हजर झाले. त्यानंतर लगोलग रेल्वे पोलिस खात्याचे अधिकारी प्रभाकर रेड्डी देखील पथकासह त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अखेर मराठा आंदोलकांनी आपण रेल्वे रुळावर उभे राहून आमचे निवेदन स्वीकारावे, असे रेल्वे पोलिसांना सांगितले. त्यांनीही मराठा आंदोलकांचे निवेदन स्वीकारत आपल्या भावना सरकार दरबारी पोचवू असे आश्वासन दिले. केंद्र आणि राज्य शासनाने मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याबाबत चालढकलपणा केला तर आनखी तीव्र आंदोलन उभारू असा इशारा दिला.

jalna
Maratha Reservation: "झटकन हा निर्णय सरकार घेऊ शकत नाही कारण..", मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली जरांगे पाटलांच्या प्रकृतीची काळजी

खादगाव शिवारात "समृद्धी" महामार्गावर तीन तास रास्ता - रोको

मुंबई ते नागपूर अशा महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग देखील मराठा समाज बांधवांनी आंदोलनासाठी लक्ष्य केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार वेळकाढू धोरण स्वीकारत आहे. अशी भावना झाल्याने खादगाव येथील सकल मराठा समाज बांधवांनी थेट समृद्धी महामार्ग गाठत सोमवारी (ता. ३०) दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन्ही बाजू अडवत तीन तास रास्ता - रोको आंदोलन केले.

jalna
Maratha Reservation : टायर जाळून आणि 'एक मराठा लाख मराठा' घोषणा देत बाजार गेवराई पाटीवर तासभर रास्ता रोको

यावेळी रस्त्याच्या मधोमध टायर जाळून "एक मराठा - लाख मराठा", "आरक्षण आमच्या हक्काचे" यासह सरकार विरोधी घोषणा दिल्या. शेवटी पोलिस व महसूल प्रशासन आणि मराठा समन्वयक यांनी मध्यस्थी केल्याने आंदोलकांनी तूर्त आंदोलन मागे घेतले आहे. या विशालकाय महामार्गावरील दोन्ही बाजू आंदोलकांनी अडविल्याने मुंबई ते नागपूर दरम्यान जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. हा महामार्ग झाल्यापासून प्रथमच रास्ता - रोको आंदोलन झाले असावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.