Jalna News : प्रवाशांच्या सेवेसाठी लालपरी रस्त्यावर,आजपासून बससेवा होणार सुरळीत

मंगळवारपासून बससेवा सुरळीत सुरू होणार आहे. त्यामुळे बसला कोणीही लक्ष्य करू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
st bus
st bus sakal
Updated on

जालना - विद्यार्थ्यांना घरापासून शाळा आणि महाविद्यालयापर्यंत घेऊन जाणारी आणि सामान्य नागरिकांच्या प्रवासाचे एकमेव साधन असणारी लालपरी पुन्हा रस्त्यावर आली आहे. दरम्यान, सोमवारी (ता.चार) दिवसभरात जिल्ह्यातील चार पैकी तीन आगारातून ३२ फेऱ्या झाल्या आहेत.

आता मंगळवारपासून बससेवा सुरळीत सुरू होणार आहे. त्यामुळे बसला कोणीही लक्ष्य करू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर संतप्त आंदोलकांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी तब्बल १६ बस जाळल्या.

st bus
Amol Kolhe Video : भाजपचं केंद्रीय नेतृत्व संकटात! अजित पवारांच्या बंडाची Inside Story; अमोल कोल्हेंचे खळबळजनक दावे

शिवाय आठ बसची तोडफोड केली. त्यामुळे ता. एक जूनच्या सायंकाळपासून बससेवा बंद करण्यात आली होती. जाळपोळ, तोडफोडीसह बससेवा बंद असल्याने तब्बल सहा कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे बसने १८ हजार विद्यार्थी रोज प्रवास करतात. त्यात १२ हजार विद्यार्थिनी आहे. शिवाय सरासरी रोज आठ हजार महिला व एक हजार ८०० ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. मात्र, बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांसह या प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.

st bus
Nashik News : मुख्याध्यापकांचे वेतन थांबविण्यास स्थगिती; ZP माध्यामिक शिक्षणाधिकारी यांचा U- Turn

दरम्यान, रविवारपासून (ता.तीन) आंदोलनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने सोमवारी (ता.चार) जिल्ह्यातील चार पैकी तीन आगारातून बस सुरू करण्यात आल्या आहेत. यात जालना आगारातून २२, परतूर आगारातून आठ व जाफराबाद आगारातून दोन बस फेऱ्या झाल्या आहे.

शिवाय बुलडाणा जिल्ह्यातील बसही पाठविण्यात आल्या आहेत. तसेच जालना, मंठा, परतूर, हिंगोलीपर्यंत बस सोडण्यात आल्या. तर जालना ते राजूरपर्यंत बस सुरू केल्या. शिवाय सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथून ही जालना आगारात बस येण्यास सुरवात झाली होती.

st bus
Jalna Maratha Andolan : बार असोसिएशनचा ऐतिहासिक निर्णय! मराठा आंदोलकांवरील खटले लढणार विनामोबदला, आंदोलनालाही दिला पाठिंबा

दरम्यान, मंगळवारपासून (ता.पाच) जिल्ह्यातील चारही आगारातून बससेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांची सोय होणार आहे.

बस ही सार्वजनिक प्रवासाची व्यवस्था आहे. बस बंद राहिल्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय झाली होती. त्यामुळे सोमवारी जिल्ह्यातील तीन आगारातून एकूण ३२ बसफेऱ्या झाल्या आहेत. तर छत्रपती संभाजीनगर येथून काही बस जालना आगारात दाखल झाल्या. मंगळवारपासून (ता.पाच) चारही आगारातून बससेवा सुरळीत सुरू केली जाईल. त्यामुळे बसचे नुकसान होणार नाही, याची काळजी सर्व नागरिकांनी घ्यावी.

— प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, जालना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.