Jalna News : पाणी टंचाईचा बळी ; दहावीतल्या विद्यार्थीनीचा मृत्यू !

Jalna News : शहरात मागील दोन महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई जाणवत आहे.
Jalna News :
Jalna News :sakal
Updated on

Jalna News : नळाचे पाणी भरतांना विद्युत मोटारीच्या तारांचा स्पर्श होवून जोरदार विजेचा शॉक लागल्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना (ता.27) रविवारी सकाळी दहा वाजेदरम्यान भोकरदन शहरातील बालाजी मंदिरजवळ घडली. नम्रता संदीप सुरडकर (वय16) असे या घटनेत मृत झालेल्या मुलीचे नाव आहे.

Jalna News :
Pune Crime : लोणीकंद पोलिसांनी करुन दाखवलं! 48 तासात मित्राचा खून करणार्यांना केले अटक

पावसाळा अर्धा उलटूनही तालुक्यात अपेक्षित पाऊस नसल्याने सर्वच जलसाठे कोरडेठाक पडले आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे जुई धरणही रिकामे झाले असून, शहरात मागील दोन महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती

Jalna News :
Mumbai News: प्लास्टिक जप्तीतून १३ लाखांची दंडवसुली; त्यानुसार एकल वापराच्या म्हणजेच...

करण्याची वेळ आली असून, पालिकेकडून आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नळाला आलेले पाणी भरण्यासाठी प्रत्येकजण घाईगडबड करीत असल्याचे दिसून येत आहे. पाणी भरण्याच्या याच घाईगडबडीने शहरातील नम्रता सुरडकर या विद्यार्थीनीचा बळी घेतल्याची चर्चा आहे.

Jalna News :
Nashik Crime : नाशिकमध्ये हत्याकांड सुरुच! एकाच महिन्यात चाकूने भोसकून चौथा खून, 2 संशयित ताब्यात

शहरातील बालाजी मंदिर परिसरातील धोबी गल्ली येथील संदीप सुरडकर यांची न्यू हायस्कूल शाळेतदहावीत शिकणारी नम्रता नावाची मुलगी नळाला पाणी आले म्हणून घाईगडबडीने विजेची मोटार लावली व पाणी भरत असतांना अचानक तिच्या हाताचा स्पर्श विद्युत मोटारीच्या तारांना झाला व तिला जोराचा शॉक लागला. ही बाब लक्षात येताच घरच्यांनी तीला तातडीने शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीला तपासून मृत घोषित केले. या घटनेने शहरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.