Jalna News : पालकमंत्री, कृषिमंत्री हरवल्याचे लावले बॅनर

बरंजळा लोखंडेतील शेतकऱ्यांचा संताप, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
jalna news
jalna news sakal
Updated on

भोकरदन - दुष्काळ जाहीर करण्याबाबत पावले उचलली जात नसल्याने बरंजळा लोखंडे येथील महामार्गावर शेतकऱ्यांनी चक्क पालकमंत्री, कृषिमंत्री हरवल्याचे बॅनर लावले आहेत.

जालना-सिल्लोड मार्गावर लावलेल्या या बॅनरमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करणार का, पीकविमा, पीककर्ज देणार का, पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे बांधावर पंचनामे करणार का असे विविध प्रश्‍न विचारण्यात आले आहेत.

jalna news
SBI SO Result 2022: SBI च्या SO पदासाठीचा अंतिम निकाल जाहीर; 'इथे' पाहा संपूर्ण यादी

दरम्यान, पिकांचा पालापाचोळा झालेला असतानाही प्रशासन, मंत्री बांधावर यायला तयार नाहीत, त्यामुळे आमच्या भावना संबंधितांना कळाव्यात म्हणून हे बॅनर लावण्यात आल्याचे बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांनी सांगितले, पुढील काळात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

jalna news
Jalna Maratha Andolan : लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात कडकडीत बंद; एसटीच्या तब्बल 634 फेऱ्या रद्द, मतदानावर बहिष्काराचा इशारा

दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी व चारा छावण्या सुरु कराव्यात, पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी भानुदास लोखंडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.