Jalna News : पावसाळा संपला तरी प्रकल्प तहानलेले ; जिल्ह्यात केवळ ८.६६ टक्के उपयुक्त पाणीसाठा

यंदा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे यंदा पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर पावसाने सरासरी गाठली नाही.
jalna news
jalna news sakal
Updated on

जालना - जिल्ह्यात यंदा दुष्काळाला तोंड देण्याची वेळ येणार आहे. कारण पावसाळा संपला तरी जिल्ह्यातील प्रकल्प आजही तहानलेले आहेत. सात मध्यम आणि ५७ लघू प्रकल्पात केवळ ८.६६ उपयुक्त पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरणे अशक्य असल्याने पुढील उन्हाळ्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

यंदा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे यंदा पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर पावसाने सरासरी गाठली नाही. परिणामी खरीप हंगामासह रब्बी हंगाम ही धोक्यात आहे. शिवाय पाणीसाठ्याचा कायम आहे. सात मध्यम आणि ५७ लघू प्रकल्पांमध्ये आजघडीला केवळ ८.६६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

यात दोन मध्यम व ४४ लघू प्रकल्प हे जोत्याखाली आहेत. दोन मध्यम, १३ लघू प्रकल्पात २५ टक्क्यांपर्यंत तर तीन मध्यम प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे भोकरदन शहरासह विविध गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या जुई धरणात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जालना तालुक्यातील कल्याण गिरजा ४०.६४ टक्के, कल्याण मध्यम प्रकल्प ४०.४५ टक्के, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना २६.२८ टक्के, भोकरदन तालुक्यातील धामना मध्यम प्रकल्पात २४.९१ टक्के, जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा मध्यम प्रकल्पात १६.९७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

jalna news
Jalna Rain News : जिल्ह्यात ९.९० मिलिमीटर पाऊस

त्यामुळे या सात मध्यम प्रकल्पात २२.२० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर ५७ लघू प्रकल्पात केवळ ३.१७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

jalna news
Nanded Hospital Deaths : '...म्हणून गंभीर घटनेची पुनरावृत्ती झाली!'; २४ तासात २४ मृत्यूनंतर शरद पवारांनी करून दिली ठाण्यातील 'त्या' घटनेची आठवण

यंदा पूर्णा नदीही कोरडी

तळणी मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात यंदा पावसाला जोर नाही. त्यामुळे या भागातील पूर्णा नदीचे पात्रही यंदा ठिकठिकाणी कोरडे पडलेले दिसत आहे. पूर्णा नदीवरील येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंठा तालुक्यातील तळणीसह देवठाणा, ऊस्वद, कानडी, लिंबखेडा, सासखेडा, पूर्णा पाटी, दुधा,इंचा, वाघाळा, टाकळखोपा, वझर सरकटे

आदी गावांचा समावेश होतो. सध्या येलदरी धरणात ६२. २८ टक्के पाणी साठा आहे, अशी माहिती उपविभागीय अभियंता भगवान शिंदे यांनी दिली. याशिवाय सध्या खडकपूर्णा येथील धरणात ७० टक्के पाणी साठा आहे. पूर्णा नदी पात्रात परिसरातील वाघाळा, पूर्णा पाटी व देवठाणा ऊस्वद येथे कोल्हापुरी बंधारे आहेत, मात्र मागील पुरात ते फुटले होते, त्यांची दुरुस्ती अद्यापही झालेली नाही. त्यामुळे या भागात जोराचा पाऊस पडला तरी पूर्णा नदीचे पाणी न अडता वाहून जाणार आहे.

jalna news
Beed News : ई केवायसी; एकाच दिवशी ७४० ठिकाणी मेळावे

पशुधनाच्या पाण्यासह चाऱ्याचाही प्रश्‍न

पावसाने यंदा दगा दिल्याने पुढील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात पशुधनाच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा हा नागरिकांसह पशुधनासाठी खडतर जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.