एटीएम मशिनस ३० लाख पळवणाऱ्या दोघांना अटक;
जालना जिल्ह्यातील परतूर येथून पोलिसांनी केली अटक:
शहरातून पोलिसांची काढली मिरवणूक:
कळंब,ता.६ (बातमीदार) : ढोकी रस्त्यावरील जिजाऊ चौकातील स्टेट बँकेचे अख्खे एटीएम चोरट्यांनी रोख ३० लाख रुपये रकमेसह पळविल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी घडली होती.चोरट्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तैनात करून मंगळवार (ता.५) दोघा आरोपींना जालना जिल्ह्यातील परतूर येथून अटक करण्यात आली आहे.
रोख रक्कमेसह अख्खे एटीएम पळविल्याने या घटनेचा तपास लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.दरम्यान जालना पोलिसाचे पथक आणि कळंब पोलिसांनी ही संयुक्त करवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे.असे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे यांनी सांगितले.
शहरातील ढोकी मार्ग या मुख्य मार्गावर दिवसरात्र रहदारी असते.या मार्गावरील जंत्रे कॉम्प्लेक्स इमारतीतील स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये बुधवारी (ता.३०) रोख रक्कमेसह एटीएम मशीन पळविल्याची घटना उघडकीस आली. स्टेट बँकेचे एटीएम ढोकी जाणाऱ्या मुख्य मार्गावर असून चोरट्याने अख्खे एटीएम मशीन रकमेसह चोरी करताना चोरांनी पोलिसांना कुठलाही पुरावा सापडू नये, याची खबरदारी घेतली.
ही मशीन लहान वायर व दोरीचा साह्याने उचलून मोठ्या वाहनात घालून पळविल्याच्या प्रकार शहरातील सीसीटिव्ही फुटेच पोलिसांनी तपासणी केल्यानंतर उघडकीस आला.पोलिसांनी थेट केज,धारूर,माजलगाव, मानवत,शेलू पर्यंत सीसीटिव्ही फुटेज चेक केले.परभणी जिल्ह्यातील शेलु परिसरात ज्या वाहनात एटीएम मशीन पळविली ते वाहन पोलिसांना सापडले.
वाहनात झाडाचा पाला असल्याचे आढळून आले.दरम्यान पोलिसांनी सेलू परिसरातील सर्व प्रकारची झाडी तपासली पण त्या झाडाचं पाला हाच आहे याचा तपास लागला नाही.पोलिसांनी थेट परतूर मार्गावर गेले.रेल्वे गेट वरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता परतूर येथील एका घरात एटीएम मशीन फोडल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेवून गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन ही पोलिसांनी ताब्यात घेतले.
शहरात पोलीसांची वाजत गाजत मिरवणुक .
सहाय्यक पोलीस उपअधीक्षक एम .रमेश, पोलीस निरिक्षक सुरेश साबळे यांनी पोलीसांची पथके तयार करून तपासासाठी पाठवली. या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक गणेश पाटील, राम चाटे, हनुमंत कांबळे,गणेश वाघमोडे, अजीज शेख, अचुत देशमुख ,अंभारे कीरण, शाहरूख पठाण, सुनील कोळेकर, खांडेकर, करीम शेख, या पोलीस पथकाने
एटीएम मशीन दरोडाप्रकरणातील आरोपीना पकडण्यात आल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे पोलीस पथक आरोपीना घेउन येताच एसबीआय बँकेच्या कर्मचार्यांनी या पोलीसांचा हारतुरे देत सत्कार करून, छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन सवाद्य मिरवणुक पोलीस ठाण्यापर्यंत काढली.पोलीसांची मिरवणुक असल्याने मोदी गर्दी या ठीकाणी पोलीसांच्या स्वागतासाठी जमली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.