Jalna News : कोतवाल परीक्षेत सहा कॉपीबहाद्दर अटकेत

रॅकेट मोठे असण्याची शक्यता, ब्लूटूथ, मोबाइल, बटण कॅमेरा जप्त
exam
exam sakal
Updated on

जालना - कोतवाल परीक्षेदरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कॉपी करणाऱ्या पाच परीक्षार्थींसह समन्वय करणाऱ्या परीक्षार्थीला शनिवारी (ता.सात) ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे शहरातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील चार, तर सरस्वती भुवन विद्यालयातील एक हे कॉपीबहाद्दर असून बदनापूर तालुक्यातील आहेत.

जालना जिल्ह्यातील ६९ जागांसाठी कोतवाल भरती परीक्षा घेताना जिल्हा प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेत तालुकास्तरावरील परीक्षा केंद्र रद्द करून जालना शहरात १९ परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली होती. या परीक्षेसाठी ५३०६ उमेदवार पात्र होते. शनिवारी (ता.सात) या परीक्षार्थींचा पेपर होता. यापैकी ४९९६ परीक्षार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते.

तर ३१० उमेदवार गैरहजर होते. पेपर सुरू होण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाला पेपर फुटीची कुणकुण लागली होती. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये शहरातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दोन कॉपीबहाद्दरांना ताब्यात घेण्यात आले.

exam
Chh. Sambhaji Nagar : वाराणसीच्या धर्तीवर होणार आंतरराष्ट्रीय स्टेडियम विकसित

त्यांच्याकडे तपासणी केल्यानंतर कानात छोटे ब्लूटूथ आढळून आले. या प्रकारानंतर पेपर संपल्यानंतर सर्व परीक्षार्थींची पुन्हा फेरतपासणी करण्यात आली. यात तीन जण आढळून आले. यातील एका कॉपीबहाद्दराने बटण कॅमेऱ्याद्वारे प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर पाठविली. त्यानंतर चार परीक्षार्थी परीक्षा केंद्रात छोट्या ब्लूटूथद्वारे कॉपी केली. शिवाय एक जण कोतवाल भरती परीक्षाचे अर्ज भरून ही परीक्षा केंद्रात न जाता परीक्षा केंद्राच्या बाहेरून या चार कॉपीबहाद्दरांशी समन्वय करत होता.

exam
Jalna News : मराठा आरक्षणासाठी टॉवरवर चढून आंदोलन

पाच जण बदनापूर तालुक्यातील

कोतवाल भरती लेखी परीक्षेसाठी जिल्ह्यातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी शहरात तालुकानिहाय परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आले होते. राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात बदनापूर तालुक्यातील परीक्षार्थींची परीक्षेसाठी बसण्याची व्यवस्था केली होती. या एकाच केंद्रावर पाच जण मिळून आले, तर सरस्वती भुवन परीक्षा केंद्रावर एक कॉपीबहाद्दर एक मिळून आला.

तपास झाल्याशिवाय निकाल नाही

कोतवाल भरती लेखी परीक्षेतील कॉपी प्रकार पुढे आल्यानंतर या प्रकणाचा तपास सायबर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याशिवाय या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार नाही. शिवाय तपासदरम्यान पेपर फुटीचे प्रमाण अधिक असल्याचे पुढे आल्यास या परीक्षेसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()