Jalna News : लालपरी बंदच, आज तलाठी पदासाठी परीक्षा, जमावबंदी आदेश,दळणवळण कधी सुरू होणार

जिल्ह्यात ठिकठिकाणी संतप्त आंदोलनकर्त्यांनी १६ बस जाळल्या व आठ बसची तोडफोड केली.
jalna
jalna sakal
Updated on

जालना - मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर जिल्ह्यातील दळणवळण ठप्प झाले आहे. त्यात सोमवारी (ता.चार) तलाठीपदासाठी परीक्षा आहे. मात्र, जिल्ह्यातील लालपरी बंद असल्याने परीक्षा स्थळी जायचे कसे असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान, शनिवारच्या दगडफेकीनंतर शहरात रविवारी (ता.तीन) तणावपूर्ण शांतता होती.

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. येथील आंदोलक आणि पोलिस प्रशासनाचे चर्चेदरम्यान काही गोष्टी घडल्याने पोलिसांनी लाठीमार, प्लॅस्टिक बुलेटचा गोळीबार करावा लागला, अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा करण्यात आला. या कारवाईचे जिल्ह्यासह राज्यात पडसाद उमटले.

जिल्ह्यात ठिकठिकाणी संतप्त आंदोलनकर्त्यांनी १६ बस जाळल्या व आठ बसची तोडफोड केली. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील एकाही आगारातून बस बाहेर पडली नाही. शिवाय इतर जिल्ह्यातून बस जिल्ह्यात आल्या नाहीत. परिणामी एसटीचे मागील तीन दिवसांमध्ये तब्बल पाच ते साडेपाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

jalna
SA vs Ind Test Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून रोहित-विराटचा पत्ता कट, हा दिग्गज होणार कर्णधार?

शिवाय खासगी वाहनांची रेलचेल कमी आहे. त्यामुळे प्रत्येक जण आहे त्याच ठिकाणी अडकून पडलेला आहे. त्यात सोमवारी (ता.चार) राज्यात तलाठी भरतीची परीक्षा आहे. त्यामुळे परीक्षार्थींना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचणेही कठीण आहे.

प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार

आंदोलनाचा भडका उडाल्याने बससेवा दोन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी अधिकचे पैसे ही मोजण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. अनेकजण दुचाकीवर सहकुटुंब लांबचा प्रवास करताना दिसत आहेत.

रस्त्यांवर जळालेल्या वाहनांचे अवशेष

जिल्ह्यातील रस्त्यांवर जळालेल्या वाहनांचे अवशेष दिसून येत आहे. आंदोलन झालेल्या रस्त्यांवर पडलेला दगडाचा खच स्वच्छ करण्यात आला आहे. मात्र, या दगडफेक आणि जाळपोळीच्या घडल्याने भितीपोटी एसटीसह खासगी वाहनधारकही बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे उद्रेक झालेल्या आंदोलनाची धग कमी होऊन जिल्ह्यातील दळणवळण कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जिल्ह्यात १७ सप्टेंबरपर्यंत जमावबंदी

अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला आणि त्यानंतर त्यांचे जिल्ह्यात उमटलेले तीव्र पडसादामुळे सोमवारपासून ता.१७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके दिले आहेत. सोमवारी सकाळी सहा वाजेपासून हे जमावबंदी आदेश लागू होणार आहेत.

jalna
BH Series : कोणाला मिळते BH सिरीजची नंबर प्लेट? नेमकी काय असते ही सिरीज?

शांतता राखण्याचे प्रशासनाकडून आवाहन

शहरात सोमवारी (ता.चार) तलाठी पदासाठी परीक्षा होणार आहे. ही परीक्षा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केले आहे.

वकील संघ समाजाच्या पाठीशी

शहरातील अंबड चौफुली येथे समाजाच्या वतीने घोषणाबाजी करत आंदोलन केले. परंतु, यावेळी पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. ज्या समाजबांधवांवर पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे, त्या केसेस जिल्हा वकील संघ लढणार असल्याचे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. राहुल चव्हाण यांनी सांगितले .

jalna
Jalna News : जालन्यातील बारा गावांत मिळाल्या कुणबी मराठा नोंदी

पोलिस अधीक्षक म्हणून मी आतापर्यंत नागपूर ग्रामीण, गडचिरोली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात काम केले आहे. सामान्य नागरिकांना केंद्र बिंदू ठेवून काम करण्याची माझी पद्धत आहे. सशक्त लोकशाहीत आंदोलने झाली पाहिजे. त्यासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन केलेच पाहिजे.

त्यामुळे लवकरच आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनकर्ते व येथील ग्रामस्थांशी संवाद साधून मनभेद आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. सोमवारी (ता.चार) तलाठी परीक्षा आहे. त्यामुळे नागरिकांनी शांतता बाळगून जाळपोळ थांबवावी. जेणेकरून दळणवळण सुरू होईल. सामान्य जीवन सुखकर करण्याचा पहिला प्रयत्न केला जाणार आहे.

शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक, जालना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.