Jalna Assembly Constituency 2024 : एक कोटीची रोकड, दोन कोटी ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिस प्रशासनाची आचारसंहिता काळात कारवाई

Vidhan Sabha Elections 2024 : जालना जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात पोलिसांनी १ कोटी ७ लाखांची रोकड, २ कोटी ३३ हजारांची दारू, गांजा, गुटखा आणि ३२ तलवारी जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर १३ जण हद्दपार आणि १ हजार ४५६ जणांवर कारवाई केली आहे.
Vidhan Sabha Elections 2024
Vidhan Sabha Elections 2024sakal
Updated on

जालना : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात पोलिस प्रशासनाकडून आतापर्यंत तब्बल एक कोटी सात लाखांची रोकड आणि दोन कोटी ३३ हजारांची दारू, गांजा, गुटखा जप्त केला आहे. तर, ३२ तलवारी जप्त केल्या आहेत. याशिवाय एक हजार ४५६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईसह १३ जण हद्दपार, एक एमपीएडीएची कारवाई केली आहे.  

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.