Jalna Police : चोरीला गेलेल्या मोबाइल, टीव्हीचा शोध

मंठा पोलिसांची कामगिरी, संबंधितांना सुपूर्द
police
policesakaol
Updated on

मंठा -चोरीला गेलेल्या, हरवलेल्या मोबाइल फोन, टीव्हीचा मंठा पोलिसांनी शोध लावला. दरम्यान, संबंधितांना ते परत करण्यात आले आहे. पोलिस ठाण्यात मोबाइल चोरी, हरवल्याबाबत तसेच घरफोडीमध्ये टीव्ही लंपास झाल्याबाबत विविध तक्रारी दाखल झाल्या होत्या.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

चोरीच्या अनुषंगाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्‍लेषण करत मंठा पोलिसांनी संबंधित चोरट्यांना पकडले. त्यांच्या ताब्यातून सात मोबाइल फोन तसेच दोन एलईडी टीव्ही हस्तगत करण्यात आले. यात मंठ्यातील तक्रारदार प्रवीण बन्सीधर सानप, बालाजी मोरे, जाटखेड्यातील रामेश्वर आसाराम दुभळकर यांच्या चोरीला गेलेले तीन मोबाइल फोन,

अमोल सोपान राठोड, उमेश सुभाषराव हारनावळ, खालेद पठाण, गणेश महादा टाकरस (रा. रायगाव,जि. बुलडाणा) यांचे हरवलेले चार मोबाइल फोन शोध घेऊन परत करण्यात आले आहेत. तसेच तक्रारदार अनिल शिवलिंग जंगम, संदीप रामराव बोराडे यांचे घरफोडीत दोन एलईडी टीव्ही चोरीला गेले होते, पोलिसांनी ते हस्तगत करून त्यांना सुपूर्द केले आहेत.

police
Satara Ganeshotsav : आनंदमयी पर्वाला दिमाखात सुरुवात; तब्बल दोन लाख 35 हजार 608 गणेशमूर्तींची भक्तिभावाने स्थापना

यात एकूण सात मोबाइल फोन व दोन टीव्ही असा एक लाख चौपन्न ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल शनिवारी ( ता. १६ ) परतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश बुधवंत यांच्या हस्ते मुळ मालकास परत करण्यात आले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, सहायक पोलिस निरीक्षक सोनवळे, फौजदार आसमान शिंदे, फौजदार बलभीम राऊत, सहायक फौजदार सोपान चव्हाण, रखमाजी मुंढे, राजू राठोड, काळुसे, सुक्रे, शाम गायके, मंगेश चौरे, सुनील इलग, मांगीलाल राठोड, कानबाराव हराळ, संतोष बनकर विजय जुंबडे, आनंद ढवळे समाधान खाडे, प्रशांत काळे, आकाश राऊत, मनोज काळे, पांडुरंग निंबाळकर यांनी केली आहे.

police
India vs Nepal Asia Cup: सामना न खेळता टीम इंडिया सुपर-4 मध्ये? कँडीतून मिळाले संकेत, जाणून घ्या गणित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.