Marathwada : जालना जिल्ह्याचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटला

सातपैकी सहा मध्यम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा
marathwada news
marathwada news esakal
Updated on
marathwada news
Marathwada : मुकुंदराज घाटात ट्रॅक्टरचा अपघात: १ ठार तर १५ जखमी

जालना : यंदा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे मध्यम व लघू प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाली. मध्यम प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील पाणीटंचाई निर्माण होणार नसल्याचे चित्र आहे.

marathwada news
Marathwada : लोकार्पणानंतर सहा महिन्यांतच रस्त्याची झाली दुरवस्था

जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ६०३.१० मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा जिल्ह्यात सरासरी ७८०.६० मिलिमीटर पाऊस झाला. यंदा जिल्ह्यात मूरपाऊस अधिक झाला. त्यामुळे जिल्ह्यात मध्यम व लघू प्रकल्प यंदा ओव्हर फ्लो झालेले नाहीत. मात्र, सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या पावसाने मध्यम व लघू प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे सात मध्यम प्रकल्पांमध्ये ८३.१९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. या सात मध्यम प्रकल्पांपैकी चार मध्यम प्रकल्प हे शंभर टक्के भरले.

marathwada news
Marathwada: रेल रस्त्याची दुर्दशा; नागरिक हैराण

दोन मध्यम प्रकल्प हे ८० टक्क्यांच्या पुढे भरले आहेत. यात जालना तालुक्यातील कल्याण गिरजा प्रकल्प, कल्याण मध्यम प्रकल्प, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना आणि जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा हे चार मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. तर भोकरदन शहराला पाणीपुरवठा करणारे जुई मध्यम प्रकल्पांत ८४.२५ टक्के, धामना मध्यम प्रकल्पात ८२.९६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला.

marathwada news
Marathwada mukti sangram din : पुढील २५ वर्षांच्या विकासाचे शासनाचे नियोजन

जिल्ह्यात केवळ एक म्हणजे अंबड तालुक्यातील गल्हाटी मध्यम प्रकल्पात केवळ ३७.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात ५७ प्रकल्पांमध्ये ५९.१६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यामध्ये सह लघू प्रकल्पांची पाणी पातळी ही जोत्याखाली आहे. आठ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत, १२ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांपर्यंत, चार लघू प्रकल्पांत ७५ टक्क्यांपर्यंत तर २७ प्रकल्पांमध्ये ७६ ते १०० टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची तीव्रता भेडसावणार नाही.Marathwada

marathwada news
Marathwada mukti sangram din: शेतकऱ्याने अंगावर ओतले पेट्रोल

जायकवाडीही फुल्ल

जालना शहराला पैठण (जि. औरंगाबाद) येथील जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा होतो. जायकवाडी धरण शंभर टक्के भरल्याने जालना शहराला पाणीपुरवठा करणारे घाणेवाडी जलाशयही ओव्हर फ्लो झाले आहेत. त्यामुळे यंदा शहरात पाणीटंचाईचा प्रश्‍न भेडसावणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()