Jalna Protest : आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याची शपथ

विद्यार्थ्यांचा निर्धार, पालकांनी घेतली बैठक
jalna
jalna sakal
Updated on

बदनापूर - अंतरवाली सराटीतील आंदोलनामुळे राज्यभरात मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. दरम्यान, आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याची शपथ माळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. पाच) घेतली आहे.

या संदर्भात शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट पालकांना देखील विश्वासात घेतले आहे. विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना निवेदन सादर केले. या निवेदनावर रामेश्वर धोत्रे, दत्ता गोडसे, गोरखनाथ धोत्रे, कुंडलिक गोरे, राजू कातूरे, विक्रम धोत्रे आदी मराठा समाजातील पालकांसह विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

jalna
Jalna News : जालना जिल्ह्यात पोलिसांची वाजत गाजत काढली मिरवणूक, हे आहे कारण

मराठा समाज हा आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळावे, अशी जुनीच मागणी आहे. मात्र शासन या संदर्भात ठोस निर्णय घेत नाही. मराठा आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे, तर पालकांनीही आरक्षण मिळेपर्यंत कुठल्याही निवडणुकीला मतदान करणार नाही असा निर्धार केलेला आहे.

कल्याणराव गोरे, ग्रामस्थ, माळेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.