Jalna Rain News : जिल्ह्यात ९.९० मिलिमीटर पाऊस

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून जिल्ह्यात ता. २१ ते २६ सप्टेंबर दरम्यान येलो अलर्ट जारी करण्यात आला होता.
jalna rain
jalna rainsakal
Updated on

जालना - जिल्ह्यात सोमवारी (ता.२५) सकाळपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये ९.९० मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. यामध्ये जालना तालुक्यातील विरेगाव मंडळात सर्वाधिक ५८ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून जिल्ह्यात ता. २१ ते २६ सप्टेंबर दरम्यान येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार शहरासह जिल्ह्यात ता. २१ ते २४ सप्टेंबर दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी (ता.२४) ही शहरासह जिल्ह्यात ठीक-ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. सोमवारी (ता.२५) सकाळपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ९.९० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

यामध्ये जालना तालुक्यात सर्वाधिक ३० मिलिमीटर पाऊस झाला. जालना तालुक्यातील विरेगाव मंडळात ५८, सेवली ४२.८, जालना शहर मंडळात ३४.३, नेर २८, रामनगर २४, पाचनवडगाव २२.८, मंठा तालुक्यातील पांगरी मंडळात २८ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, मागील चार दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडाफार आधार मिळाला आहे.

jalna rain
Jalna News : शहर सीसीटीव्हीच्या नजरेत,पालिकेचा पुढाकार; विविध भागांत ४५ सीसीटीव्ही

तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

तालुका सोमवारी सकाळपर्यंत आतापर्यंत झालेला पाऊस

जालना ३० ४८३.९०

बदनापूर २.८० ४४५

भोकरदन ०.६० ४७४.७०

jalna rain
Jalna News : गाडी पंक्चर झाल्याने बकऱ्या चोरांचा डाव फसला

जाफराबाद ०.८० ५०५.७०

परतूर ६.२० ३७५.८०

मंठा १४ ३८६.३०

अंबड १०.३० ४७५.२०

घनसावंगी ८.९० ४४५.२०

एकूण ९.९० ४५४.४०

jalna rain
Satara Crime : फलटणमध्ये भरदिवसा लूटमार कोयत्याने हल्ला;तलवारी नाचवत दुकानदारांना खंडणीसाठी धमकाविले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.