कुंभार पिंपळगाव : जोरदार पावसामुळे गोदावरी नदीवरील सहा उच्च पातळी बंधाऱ्यांंचे दरवाजे उघडुन गोदावरीच्या पात्रात सोमवारी (ता.दोन) सकाळी पाण्याचा विसर्ग सुरू केला असून यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे अशी माहिती उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण, कनिष्ठ अभियंता नागराज कटकधोंड यांनी दिली.