जालना : तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून दिल्या जाणाऱ्या रेशनच्या वितरणात पारदर्शक प्रणाली आलेली आहे. त्यामुळे तुमच्या नावावर कुणी रेशनचे धान्य घेतले आहे का, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. यात रेशन कार्डधारकांना किती धान्य मिळते, प्रत्यक्ष किती धान्य उचलले? याची पूर्ण माहिती आता ऑनलाइन प्रणालीत एका क्लिकवर रेशन कार्डधारकांना मिळत आहे.