Jalna : घरोघरी शहाडा वाजवत सौभाग्याचे लेणे मागण्याची परंपरा; नवरात्रोत्सव विशेष टेंभुर्णीत शेकडो वर्षांनंतरही कायम आहे प्रथा

शेकडो वर्षांची ही परंपरा आजची पिढीही जोपासत आहे
jalna
jalna sakal
Updated on

टेंभुर्णी - नवरात्रोत्सवानिमित्त प्राचीन काळापासून सुरू असलेली शहाडा (हलगी) वाजवण्याची परंपरा आजही टेंभुर्णी येथे सुरू असून दररोज पहाटे साडेतीन वाजेपासून हलगीच्या तालावर सौभाग्याचे लेणे मागण्याचे काम येथील मातंग समाजबांधव मनोभावे करतात.

देवीने असुरांचा नाश करत विजय संपादन केला, त्यानिमित्ताने देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या नवरात्र उत्सवात येथील मातंग समाजबांधवांच्या वतीने दरवर्षी घरोघरी जाऊन हळदी कुंकवाचे लेणं मागितलं जातं. शेकडो वर्षांची ही परंपरा आजची पिढीही जोपासत आहे. देवीचा जागर होत असल्याने सकाळच्या प्रहरी देवी-देवतांच्या पूजनाने जाग यावी म्हणून ही पद्धत प्राचीन काळी सुरू झाली असे जुनेजाणते सांगतात. पूर्वी गावोगावी फक्त मंदिरासमोरच शहाडा वाजविला जात होता. परंतु शेकडो वर्षांपासून टेंभुर्णीत घरोघरी जाऊन शहाडा वाजवण्याची परंपरा कायम झाली आहे.

नवरात्र उत्सवास प्रारंभ होताच येथील मातंग समाजातील युवक विजय गोफणे, प्रदीप सगट, किरण काकडे, किशोर गोफणे व अजय ससाने हे पहाटेपासून गावात हलगी वाजविण्यासाठी निघतात. पहाटे साडेतीन वाजता देवीच्या मंदिरासमोर सर्वप्रथम हलगीचा निनाद करून शहाडा वाजविला जातो. यानंतर प्रत्येक गल्लीत वाद्य वाजवले जाते. महिलांकडून या युवकांचे औक्षण करून त्यांच्याकडे असलेल्या पात्रात कुंकवाचा दान दिलं जातं.

jalna
Navratri 2023: नवरात्रीत लवंग-कापूरच्या या उपायनं घरात आर्थिक संकटाला म्हणा रामराम!

नवरात्र उत्सव स्त्री शक्तीचा जागर असून या निमित्ताने मांगल्याचे प्रतीक असलेल्या देवीचे पूजन मनोभावे केले जाते. दरम्यान पहाटेच शहाडा वाजवण्याची पद्धत आहे. देवीच्या कृपेने सौभाग्य अबाधित राहावे म्हणून हे दान मागणाऱ्या भाविकांना कुंकवाचा दान दिले जाते. जेणेकरून सौभाग्याला दीर्घायुष्य लाभते अशी आख्यायिका आहे.

जयश्री करवंदे, टेंभुर्णी

jalna
Jalna News : वाढत्या उन्हाचा कपाशीला फटका; पातेगळ पीक पिवळे पडू लागले, विहिरींतही नाही पुरेसे पाणी

पूर्वीच्या काळी देवदेवतांच्या पूजनाआधी मंदिरासमोर शहाडा वाजवून मंगल गीत गायले जात असत. कालानुरूप यात बदल होत गेला. यामुळे सर्वच गावकरी सकाळीच उठून मांगलिक कार्य करण्यासाठी सज्ज होतात. नवरात्र उत्सवात पवित्र व प्रसन्न वातावरण राहते. शेकडो वर्षाची ही परंपरा आजही जोपासली जात आहे.

दगडूबा खलसे, टेंभुर्णी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.