Jategaon Crime : साखरपुडा झाल्यानंतर तिस-या दिवशीच तरुणीने गळफास घेऊन संपविले जीवन

तीन लाखाची मागणी करत बदनामीचीही दिली धमकी.
Crime
Crimesakal
Updated on

जातेगाव (जि. बीड) : साखरपुडा झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी तरुणीने राहत्या घरातील लोखंडी आडूला गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना बुधवारी (ता. १९) रात्री जातेगाव येथे घडली.

भूमिका देविदास कारके (वय २०) रा. जातेगाव, ता. गेवराई असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. सदरील तरुणीचा विवाह निश्चित झाल्याने (ता. १६) मृत भूमिका हिच्या घरी साखरपुडा करण्यात आला होता.

मात्र, साखरपुड्यानंतर होणारा पती पृथ्वीराज सुतार, सासरा मोतीलाल सुतार, सासू मिराबाई सुतार (रा. गेवराई जि. बीड) हे वारंवार फोन करून संबंधीत तरुणीला तुझ्या आई वडिलांकडून व्यवसायासाठी तीन लाख रूपये घेवून दे, अशी मागणी करत लग्न तोडण्याची आणि बदनामीची धमकी देत होते.

या धमकीला आणि त्रासाला कंटाळून भूमिकाने आत्महत्या केल्याची तक्रार सत्यभामा कारके यांनी गुरुवार (ता. २०) दिली. यावरुन पोलीसांनी होणारा पती व त्याचे आई वडिल यांच्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांनी दिली. फौजदार स्वप्नील कोळी पुढील तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.