पैठण : येथील जायकवाडी प्रकल्पाच्या (नाथसागर) धरणातून गोदापात्रात सोमवारी ( ता.९) गोदापात्रात तीन हजार १४४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरण ९७.३०टक्के क्षमतेने भरल्यामुळे धरण प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.पाणी सोडण्यासाठी ०.५ फुटाने ६ दरवाजे दुपारी एक वाजेच्या दरम्यान उघडण्यात आले आहे.