Latest Paithan News: येथील जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणी साठा वाढत आहे.त्यामुळे दुसऱ्या दिवशी ही धरण प्रशासनाने १८ दरवाजे सुरु ठेवुन पाण्याची विसर्ग क्षमता वाढविली आहे. त्यानुसार गुरुवारी (ता.२६)तब्बल ५६ हजार ५९२ क्युसेक पाणी धरणातुन गोदापात्रात पाणी सोडण्यात आले आहे. धरणात पाणलोट क्षेत्रातून ४५ हजार ४७७ क्युसेक आवक सुरु आहे.