Paithan News: येथील जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. १८ दरवाजांतून अडीज फूट, पाणी सोडले जात असल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले.
या दरवाजांद्वारे १० हजार ९८० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. वरील भागातून धरणात १० हजार १९२ क्युसेकने आवक सुरू आहे. मृतसाठ्यात गेलेल्या या धरणातून यंदाच्या पावसाळ्यात गोदापात्रात पाणी सोडण्याची ही दुसरी वेळ असून, धरण सद्यःस्थितीत शंभर टक्के भरले आहे.