तुळजाभवानी मंदिर उघडावे यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधताना श्री.पाटील यांनी कोरोना आजार कमी झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर उघडेल, असे कार्यकर्त्यांना सांगितले.
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या Nationalist Congress Party 'परिवार संवाद' उपक्रमास गुरुवारी (ता.२४) प्रारंभ झाला. तुळजाभवानी मातेचे Tuljabhavani Mata दर्शन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील Water Resources Minister Jayant Patil यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद सुरू केला. तुळजाभवानी मातेच्या महाद्वाराजवळ श्री.पाटील यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. तुळजाभवानी मातेची महाद्वारासमोर आरती केली. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी श्री.पाटील यांचे स्वागत केले. दर्शन झाल्यानंतर भवानी रस्ता मार्गे श्री.पाटील हे परिवार संवाद कार्यक्रमासाठी आले. तुळजाभवानी पुजारी मंडळ सभागृहात राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde, संपर्कमंत्री संजय बनसोडे Sanjay Bansode, रूपाली चाकणकर Rupali Chakankar, मेहबूब शेख, जीवनराव गोरे, जयसिंगराव गायकवाड, सक्षणा सलगर, आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोकुळ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तुळजापूर, उमरगा, लोहारा आदी भागातील कार्यकर्त्यांनी पक्षाविषयीच्या भावना तसेच अडीअडचणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे मांडल्या. श्री.पाटील यांनी बूथ कमिटीपासून ते तालुका कार्यकारिणीपर्यंत उभारणीसाठी काय काय उपाय योजना केलेल्या आहेत. तसेच गाव पातळीवर समाजातील प्रत्येक घटकास सोबत घेऊन काम करण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. jayant patil advise to party workers work village wise
तुळजाभवानी मंदिर उघडावे यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधताना श्री.पाटील यांनी कोरोना आजार कमी झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर उघडेल, असे कार्यकर्त्यांना सांगितले. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी ओबीसी कार्यकर्ते तसेच अन्य समाजातील विविध घटकांचे काम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून द्यावे, असे सांगताना महिलांचा युवकांचा ओबीसी समाजातील घटकांचे प्रश्न मिटविण्यासाठी सर्वांनी गावनिहाय काम उभा करावे असे आवाहन केले. या प्रसंगी उमरगा, लोहारा तसेच तुळजापूर येथील कार्यकर्त्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, रेणुका इंगोले, रूबाब पठाण, भैरवनाथ लांडगे, राष्ट्रवादी ओबीसी संघटनेचे तालुकाध्यक्ष विक्की घुगे, ताजुद्दीन शेख, विनोद जाधव, अजित पाटील (उमरगा), आतिश जगताप (उमरगा) यासह अनेकांनी व्यथा तसेच विविध मागण्या श्री.पाटील यांच्यापुढे मांडल्या. यावेळी राष्ट्रवादी प्रदेश युवकचे अध्यक्ष सुरज चव्हाण, प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा वर्षाराणी पवार, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष राजश्री देशमुख, राजाभाऊ गायकवाड गोंधळी, माजी नगरसेवक धनंजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष गणेश कदम, विवेक शिंदे, महेश चोपदार, शशी नवले, शरद जगदाळे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, रोहित चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर चोपदार, गणेश ननवरे, फिरोज पठाण, जुबेर शेख, दिनेश शिरसागर, तोफिक शेख, मकसूद शेख ,मुस्ताक कुरेशी, शफी शेख, सचिन कदम, सुनील साळुंके ( लोहारा), जगदीश सुरवसे, बालाजी पाटील आदी उपस्थित होते. मंत्री जयंत पाटील यांचे स्वागत काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड.धीरज पाटील, सुनील चव्हाण विचार मंचाचे अध्यक्ष नगरसेवक सुनील रोचकरी, लखन पेंदे यांनी केले. यावेळी लोहारा येथील नागण्णा वकील यासह काँग्रेस कार्यकत्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
दौरा कार्यकर्त्यांना बळ देणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शहरात सकाळी ११ ते दुपारी दोन वाजेपर्यंत मोठा वेळ कार्यकर्त्यांसमवेत दिला. तसेच अनेक अडचणी ऐकून घेतल्या. तुळजाभवानी कारखाना बंद आहे असे सांगितल्यानंतर त्यांनी याबाबत कार्यकर्त्यांची विचारविनिमय ही केला. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अत्यंत गंभीर आणि अडचणीच्या वेळी जयंत पाटील यांचा झालेला दौरा कार्यकर्त्यांच्या इच्छा शक्तींना बळ देणारा होईल, अशा अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या कोणतेही मोठे पद नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.