हिंगोली : राज्यातील जनता अतिवृष्टी आणि पूरस्थितीला तोंड व पाठबळ देणाऱ्या सरकारची वाट बघतेय. मात्र हे सरकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचेच झाले मंत्रिमंडळासह खातेवाटप अडकले कशात असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. ते गुरुवारी (ता.१४) रात्री नांदेडवरुन वाशिमला जात असताना हिंगोलीत (Hingoli) शासकीय विश्रामगृहात थांबले असता कार्येकर्ते व प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. आमदार संतोष बांगर यांचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ यावेळी कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांना दाखवले. (Jayant Patil Attack On Chief Minister Eknath Shinde And Deputy CM Devendra Fadnavis)
यावेळी जयंत पाटलांनी सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले, राज्यात अतिवृष्टी, पूरपरिस्थितीचे मोठे संकट असताना केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचेच सरकार आहे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने लोकांपर्यंत सरकार पोहोचत नाही. मदतीसाठी पोहोचायला इतर मंत्र्यांची मदत झाली असती. त्यांच्यात काही मतभेद आहेत का मंत्रिपदाची संख्या खातेवाटपात अडकले काय हे कळायला मार्ग नाही, असेही ते म्हणाले. मंत्रिमंडळावरच अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्यांनी असे काहीही निर्णय घेणे अपेक्षित नाही.
पूर्वीचा निर्णय बदलून जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा आहे. कधी जनतेतून तर कधी नगरसेवकातून नगराध्यक्षाची निवड करताना सामान्यांचे प्रश्न सुटतील की नाही याचा विचार झाला नाही. नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि नगरसेवक दुसऱ्याच पक्षाचे निवडून आले की त्या शहराच्या विकासाला बाधा पोहोचते, असा पूर्वीचा अनुभव आहे असे पाटील म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माधव कोरडे, बालाजी घुगे, संजय दराडे, बी.डी.बांगर, संतोष गुठ्ठे आदीच उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.