जेवळी (ता. लोहारा) येथील संशोधक प्रा. सिद्रामप्पा शिवशंकर धरणे यांच्या केळी, कमळाचा बुंधा, मुळ व तांदळाचा तनिस (काड्या) यापासून पाण्याचे शुद्धीकरण करता येते या संशोधनाला भारत सरकारकडून पेटंट मंजूर केला आहे.
हे संशोधन ग्रामीण विकासाठी अतिशय उपयुक्त आहे. यापूर्वी त्यांच्या विविध क्षेत्रातील संशोधनासाठी बारा पेटंट मंजूर झाले आहे. एक डझनभर पेटंट मंजूर झालेले या भागातील ते एकमेव संशोधक असून या बाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जेवळी येथील रहिवासी असलेले प्रा. सिद्रामप्पा धरणे हे एम.ई. सिव्हिल असून त्यांनी 'गेट' परिक्षा ही तीन वेळा उत्तीर्ण राहिले आहेत. त्यांचे आज पर्यंत एकूण ६५ पेटंट नोंदणीकृत आहेत. या पैकी ६२ पेटंट प्रकाशित झाले असून यातील एक डझन संशोधनाला भारतीय सरकारकडून पेटेंटची मंजूरी मिळाली आहे.
एक डझनभर पेटंट मंजूर झालेले या भागातील ते एकमेव संशोधक आहेत. या व्यतिरिक्त विविध क्षेत्रातील त्यांचे ३६ शोध निबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत. त्यांना २०१७ मध्ये यू.ए.ई. या देशाकाडून पाणी व ऊर्जा संबंधित संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाला आहे.
आता केळी, कमळाचा बुंधा, मुळ व तांदळाचा तनिस (काड्या) या टाकावू पदार्थांपासून पाण्याचे शुद्धीकरण करता येते हे त्यांनी संशोधनातून सिद्ध केले आहे. हे संशोधन प्रा. सिद्रामप्पा धरणे, डॉ. मदनलाल सुर्यवंशी व प्रा. सिध्दार्थ कुंभार यांनी एकत्रितपणे केला आहे.
यामुळे आता अगदी स्वस्तात व सेंद्रिय जलशुद्धीकरण करता येणार असून या टाकाऊ पदार्थांपासूनही शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार आहे. तसेच नवीन उद्योजकांना लघू जल शुद्धीकरण यंत्र बनविण्यासाठी चालना मिळणार आहे.
प्रा. सिद्रामप्पा शिवशंकर धरणे यांना विविध क्षेत्रातील संशोधनासाठी भारत सरकारकडून आतापर्यंत एकूण बारा पेटंट मिळाले आहेत. यापुर्वी त्यांच्या
१) आरसीसी आणि फेरोसमेंट बबल डेक स्लॅब,
२) मुख्य सर्पिल मजबुतीकरणासह भूकंप प्रतिरोधक वर्तुळाकार स्तंभ,
३) सौर पॅनल्सवर उत्तल लेन्सच्या ॲरेज एम्बेड करण्याची पद्धत
४) पाणी गरम करण्यासाठी एक कार्यक्षम सोलर धर्मल रिसेप्टर ॲरे
5) स्पोर्ट्स बॅट विथ वेट एन्हान्समेंट कम-ॲडजस्टमेंट सिस्टीम,
६) भूकंप प्रतिरोधक फेरोसमेंट पोकळ स्तंभ आणि पोकळीच्या भिंती,
७) कंपोजिट आरसीसी/फेरोसमेंट ग्रिड स्लॅब,
८) कातरण मजबुतीकरण व स्टिरपसह बीम आणि स्तंभ,
९) भूकंप प्रतिरोधक ओव्हरहेड वॉटर टैंक,
१०) कार्यक्षमता वाढवणे-सौर ड्रायर,
११) मजबुतीकरणांच्या वेगवेगळ्या आकाराच्या प्रोफाइलसह आरसीसी स्लॅबच्या वर्तनात सुधारणा या संशोधनास भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.