जिंतूर : येलदरीच्या धरणात ६५ टक्के जलसाठा

गतवर्षी या दिवसांत तालुक्यात अतिवृष्टी झाली होती
yeldari dam
yeldari damsakal
Updated on

जिंतूर : पूर्णा पाटबंधारे विभागाच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाच्या जलाशयात मंगळवारी (ता. २६) दुपारपर्यंत ६५.११ टक्के जलसाठा उपलब्ध झाला होता.काही दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने भीजपाऊस पडत आहे. त्यामुळे जलाशयाच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होत आहे. गतवर्षी या दिवसांत तालुक्यात अतिवृष्टी झाली होती; तसेच वरील भागात बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे २६ जुलै २०२१ रोजी येलदरी धरणाच्या जलाशयाने ७२.९१ टक्के पाणीपातळी गाठली होती.

सद्यःस्थितीत येलदरीच्या जलाशयात एकूण पाणीसाठा ६५१.९६० दशलक्ष घनमीटर असून, ५२७.२९६ जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाची पाणीपातळी ४५८.८२० मीटर आहे. जिवंत पाणीसाठ्याची टक्केवारी ६५.११ आहे. गेल्या चोवीस तासांत जलाशयात २.१८७ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली असल्याची माहिती संबंधित कार्यालयाकडून सांगण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.