Kannad: दहा वर्षीय मुलाचा शिवना नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू

Latest Hatnur News: पुढील तपास पोहेकॉ. कैलास करवंदे व संजय आटोळे करीत आहेत.
Kannad: दहा वर्षीय मुलाचा शिवना नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू
Updated on

Latest Sambhajinagar News: शिवना नदीपात्रातील पाण्यात बुडून दहावर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. दोन) दुपारच्या सुमारास घडली. गोकुळ साहेबराव गुंजाळ (वय दहा) मृताचे नाव आहे.

हतनूर येथे शिवना नदी तीरावर बुधवारी (ता. दोन) गावातील काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धूत असताना केटी बंधाऱ्याच्या बाजूला पाण्यात एक मुलगा बुडत असल्याचे महिलांना दिसून आले. त्यांनी लगेच आरडाओरडा केला असता गावातील इजाज सय्यद, लखन बिरुटे, रामू बिरुटे, अनिल जाधव आदींसह काही ग्रामस्थांनी धाव घेतली.

Kannad: दहा वर्षीय मुलाचा शिवना नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू
Kannad Crime : फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थीं-विद्यार्थींनींना सहा गुंडाकडून रस्त्यावर दगडी फरशीने मारहाण; रिक्षा चालक आरोपी ताब्यात, पाच जण फरार

मदतकार्य करत पाण्यात बुडालेल्या गोकुळला पाण्याबाहेर काढले. त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कांबळे यांनी तपासून मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. गोकुळ हा चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होता. यावेळी सपोनि.डॉ. रामचंद्र पवार, पोहेकॉ. कैलास करवंदे, संजय आटोळे, होमगार्ड मनोजकुमार घोटूरसिंग, पोलिस मित्र संतोष ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली.

या घटनेची कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ. पुढील तपास पोहेकॉ. कैलास करवंदे व संजय आटोळे करीत आहेत

Kannad: दहा वर्षीय मुलाचा शिवना नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू
Kannad Crime : फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थीं-विद्यार्थींनींना सहा गुंडाकडून रस्त्यावर दगडी फरशीने मारहाण; रिक्षा चालक आरोपी ताब्यात, पाच जण फरार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.