Karhad News: पोलिसांची मोठी कारवाई, कर्णकर्कश हॉर्न, सायलेन्‍सरवर फिरवला बुलडोझर

कऱ्हाड शहर वाहतूक पोलिसांकडून वॉच ठेऊन ही धडक कारवाई केली | Karhad city traffic police kept a watch on this strike action
: पोलिसांची मोठी कारवाई, कर्णकर्कश हॉर्न, सायलेन्‍सरवर फिरवला बुलडोझर
Karhad Newssakal
Updated on

Crime News: बुलेट गाडीला लावलेल्या सायलेन्सरमध्ये बदल करून दुसरे सायलेन्सर आणि कर्णकर्कश हॉर्न लावणाऱ्यांवर शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्याअंतर्गत ४७ सायलेन्सर, तसेच कर्णकर्कश हॉर्नवर वाहतूक पोलिसांनी बुलडोझर फिरवला.

युवकांमध्ये क्रेझ असलेल्या बुलेट दुचाकीला कंपनीकडून देण्यात आलेल्या सायलेन्सरमध्ये छेडछाड करून तसेच नियमबाह्य कर्णकर्कश हॉर्न बसवून स्टंटबाजी व धूम स्टाइल दुचाकी चालवणाऱ्या बुलेट चालकांवर कऱ्हाड शहर वाहतूक पोलिसांकडून वॉच ठेऊन ही धडक कारवाई केली.

: पोलिसांची मोठी कारवाई, कर्णकर्कश हॉर्न, सायलेन्‍सरवर फिरवला बुलडोझर
Sankarshan Karhade: "ती सभा, ती गर्दी, तो आवाज, ती घोषणा..."; सध्याच्या राजकीय परिस्थितीवर संकर्षण कऱ्हाडेची खास कविता, व्हिडीओ एकदा बघाच

यामध्ये एकूण ४७ बुलेट दुचाकींचे सायलेन्सर जप्त करण्यात आले होते, तसेच नियमबाह्य कर्णकर्कश हॉर्नवरही कारवाई करून ते पोलिसांनी जप्त केले होते. त्यावर वाहतूक पोलिसांनी आज बुलडोझर फिरवला. पोलिस अधीक्षक समीर शेख, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वरुटे, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

: पोलिसांची मोठी कारवाई, कर्णकर्कश हॉर्न, सायलेन्‍सरवर फिरवला बुलडोझर
Bhaurao Karhade interview : भाऊराव कऱ्हाडे यांचा आगामी चित्रपट

यावेळी वरुटे यांनी शाळा, महाविद्यालय सुरू होणार असून, पालकांनी अल्पवयीन मुलांना दुचाकी देऊ नये. विनापरवाना दुचाकी चालवणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, विद्यानगर, सैदापूर, तसेच कऱ्हाड शहरात ही कारवाई मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगितले.

: पोलिसांची मोठी कारवाई, कर्णकर्कश हॉर्न, सायलेन्‍सरवर फिरवला बुलडोझर
Sankarshan Karhade: पहाटे अडीच वाजता मंदिरात गेलो अन्... अंबाबाईच्या दर्शनाला गेलेल्या संकर्षणला आला विलक्षण अनुभव! पोस्ट व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.