पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील काही जिल्ह्यांमध्ये हा खास बैलांचा सण साजरा केला जातो. तर महाराष्ट्रातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये याच सणाला 'पोळा' असे म्हटले जाते. तो श्रावण महिन्यातील अमावस्येला येतो.
उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा शहर Umarga व तालुक्यातील अनेक गावात गुरुवारी (ता.२४) कारहुन्नवी हा सण कोरोनोचे Corona सावट असल्यामुळे साधेपणाने साजरा करण्यात आला. शेतकरी बांधव कर्नाटकी बेंदूर (कारहुन्नवी) Bendur सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि तिथी बदलत असल्याचे पाहायला मिळते. कर्नाटकी बेंदूर (कारहुन्नवी) Karhunnavi सण कधी आहे, तो कसा साजरा करतात जाणून घेऊया....
भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी संस्कृती Agriculture हा देशाचा प्राण आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. कृषी संस्कृती म्हटले की, शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी येतात. आपल्या भारतीय संस्कृतीत Indian Culture अनेक सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. यापैकीच एक आपल्या मातीतील कारहुन्नवी. आषाढी एकादशीपासून विविध प्रकारच्या सण, उत्सवांना सुरवात होते. देशभरातील अनेक भागात वैविध्यपूर्ण सण साजरे केले जातात. यापैकी पश्चिम महाराष्ट्र Western Maharashtraआणि कर्नाटक सीमेवरील Karnataka काही जिल्ह्यांमध्ये हा खास बैलांचा सण साजरा केला जातो. तर महाराष्ट्रातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये याच सणाला 'पोळा' Bail Pola असे म्हटले जाते. तो श्रावण महिन्यातील अमावस्येला येतो. शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सकाळपासून गाय-बैलांना आंघोळ घातले जाते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घातली जाते. या शिवाय घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात. त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि हीच पुरणपोळी नंतर बैलांना खायला दिली जाते.बैलांची खांदे मळणी वशींडापासूनचा पुढील भाग आणि मानेच्या वरचा भाग म्हणजे खांदा. सणाच्या दिवशी बैलांची खांदेमळणी केली जाते. बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात. त्यानंतर बैलांच्या खांद्यांना हळद लावली जाते. सणाच्या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला जुंपले जात नाही. बैलांची ढोलताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढली जाते.karhunnavi festival celebrate under corona shadow in umarga osmanabad
कोरोनामुळे साधेपणाने सण साजरा
उमरगा शहरातील काही भाग तसेच कसगी, कदेर, गुंजोटी, भूसणी, जकेकुर, कोळसूर (गुंजोटी) आदी गावात कारहुन्नवी सण कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे साधेपणाने साजरा करण्यात आला. ढोलताशांच्या गजरामध्ये काढण्यात येणाऱ्या बैलांच्या मिरवणुकीवर यंदा निर्बंध आल्याने शेतकरी बांधवांचा उत्साह कमी झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.