Video : काेराेना व्हायरसची साखळी ताेडायची...तर वाढवा प्रतिकारशक्ती  

Nanded News
Nanded News
Updated on

नांदेड : व्हायरसला आपण पराभूत नक्कीच करू शकतो. मीच माझा रक्षक, ही संकल्पना मोठं बळ देणारी आहे. रोग प्रतिकार शक्तीला चालना देण्यासाठी आवळा, संत्री, लिंबू तसेच चिकन, मटन, मासे आदींचे सेवन करावे. ज्यामुळे आपल्यातील प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल, असे आवाहन सायन्स महाविद्यालयातील प्रा. डाॅ. किरण शिल्लेवार यांनी केले आहे. 

डिसेंबर २०१९ राेजी चीनच्या वुहान शहरात काेराेनाचा पहिला रुग्ण सापडला. डाॅ. लिन विल्यम (चीन) या व्हायरसबद्दल संशाेधन करू लागले. काही अंशीही पण माहिती आहे की, चीनने जैविक हत्यार म्हणून त्याच्यावर संशाेधन करू लागले व त्यांच्याच लॅबमधून हे व्हायरस बाहेर पडले आणि डाॅ. लिन विल्यम यांचा मृत्यू आठ फेब्रुवारी २०२० राेजी झाला. काही दिवसांतच या व्हायरसचा प्रसार जगभरात झाला. त्यापैकी चीन, इटली, अमेरिका, इंग्लड, स्पेन येथे रुग्णांची संख्या अधिक झाली. आपल्या महाराष्ट्रात १० मार्च २०२० नंतर कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण वाढायला सुरुवात झाली.   
 
प्रतिकारशक्ती मजबूत असावी
साधारणपणे ९० टक्के लाेकांमध्ये हा आजार पूर्णपणे बरा हाेताे. त्यासाठी आपली प्रतिकार शक्ती मजबूत पाहिजे. काेराेना विष।णूचे पी. एच. ५.५ ते ८.५ पर्यंत असताे. संशाेधन व्हायरालाॅजी आणि एेतिहासीक संशाेधन जर्नलमध्ये म्हटले आहे. काेराेनाचा विषाणू पराभव करण्यासाठी आपल्याला फक्त इतकेच पाहिजे आहे की, आपण व्हायरसच्या वरील पी. एच. पातळीपेक्षा जास्त प्रमाणात क्षारीयुक्त पदार्थ खाणे आवश्‍यक आहे. त्यापैकी लिंबू ९.९ पी.एच., लसून १३.२ पी.एच., संत्रा ९.२ पी. एच. आवळा १५.६ पी. एच. हे आपले राेग प्रतिकार शक्तीला चालना देण्यासाठी हे सेवन वाढवावे. आवळा, संत्रा, लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असतात. ज्यामुळे प्रतिकार शक्ती चांगली असते. 

मांसाहार आवश्‍यकच
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मटन, चिकनसोबतच मासेही खायलाच पाहिजे. कारण मांसाहारमध्ये व्हिटॅमिन ‘अ’ आणि ‘ड’ ची मात्रा भरपूर असते. ज्यामुळे प्रतिकार शक्तीमध्ये भर पडते. आपण मासे हे १०० डिग्री सेंटिग्रेडवर शिजवून खाताे. ज्यामुळे कुठल्याही राेगांना परिणाम आपल्यावर हाेत नाही. काेराेना व्हायरसची साखळी ताेडण्यासाठी घरात बसणे हाच पर्याय आहे. आपल्याकडे अवधी भरपूर आहे. याेग्य नियाेजनाने या काेराेना राक्षसास आपण पराभूत नक्कीच करू शकताे. ‘मीच माझा रक्षक’ ही संकल्पना माेठी बळ देणारी आहे. म्हणून नियमांचे पालन करून आपणच आपली आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे.  

काेराेना विषाणूची माहिती
काेराेना विषाणू आता १२० ज्ञानाेमीटर असताे. काेराेना हा व्हायरस आहे. ताे प्राेटिन माॅलाेक्युल आहे. त्यामुळे तो सजीव नसल्याने औषधांनी त्याला मारता येत नाही. अॅन्टीपायोटिक्स घेऊन आपण बॅक्टेरिया मारू शकताे. कारण ते सजीव असतात. या प्राेटिन माॅलाेक्युलवर एक प्राेटेक्टिव्ह लेवर असते. ते लिपिडस फ्यॅटीॲसिडपासून बनलेला असते. ते अवरण साबणाच्या पाण्यात विरघळताे म्हणून साबण लावून हात चाेळावे. हे आवरण गेले की, उरलेले डीएनए हा आपाेआप डिके हाेऊन जाताे. हा व्हायरस त्वचेतून आपल्या शरीरात जात नाही. ताे एखाद्या माॅईस्ट पदार्थातून आपल्या शरीरात जाताे. म्हणून ताेंडाला हात लावू नका, डाेळे चाेळू नका, कारण तेथे काेराेना लागताे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.