खरिपाची केवळ २१ टक्के पेरणी; अनेक भागात पावसाची प्रतीक्षा

यंदा शेतकऱ्यांनी तुरीऐवजी उडदाला पसंती दिल्याचे चित्र आहे. यावर्षी पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने मोठ्या उत्साहाने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली
Osmanabad
OsmanabadOsmanabad
Updated on

परंडा (उस्मानाबाद): यावर्षी पावसाने चांगली सुरवात केली असली तरी ठरावीक भागातच पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पेरणीच झाली नाही. जिथे पेरणी झाली तेथील पिकाला पावसाची गरज आहे. कुठे पेरणीची चिंता तर कुठे पेरलेल्या पिकांची काळजी असे चित्र आहे. तालुक्यात आतापर्यंत २१ टक्के पेरणी झाली आहे. उर्वरित पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

यंदा शेतकऱ्यांनी तुरीऐवजी उडदाला पसंती दिल्याचे चित्र आहे. यावर्षी पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने मोठ्या उत्साहाने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली. मात्र, पावसाने ठरावीक भागातच हजेरी लावल्याने तेथेच पेरण्या झाला. तालुक्याच्या इतर भागात पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने या भागातील पेरण्या झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामातील उसाचे व कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र वगळता खरिपाचे क्षेत्र ३३ हजार ६८० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी सात हजार १३२ हेक्टर क्षेत्रावर गुरुवारपर्यंत (ता. एक) पेरणी झाली आहे. अवघी २१ टक्के पेरणी झाली आहे. खरीपाच्या उत्पन्नावर सण, वार, मुलांचे शिक्षण अन् लग्नाचेदेखील नियोजन शेतकऱ्यांकडून केले जाते. मात्र, पेरणी झाली नसल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांची अडचण कायम राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. पिके चांगली तरारून आली आहेत. काही भागाला पेरणीसाठी तर कुठे उगवून आलेल्या पिकाला मोठ्या पावसाची गरज आहे.

Osmanabad
भारतीय रेल्वे पुन्हा सुरू करतेय 'स्पेशल ट्रेन'; जाणून घ्या यादी

अशी झाली पेरणी
तालुक्यात तुरीचे क्षेत्र दहा हजार पाचशे हेक्टर असून, अवघ्या एक हजार ९९४ हेक्टर क्षेत्रावर (१८.९९ टक्के) पेरणी झाली आहे. मुगाचे क्षेत्र दोन हजार ५०० हेक्टर असून, अवघ्या ७३ टक्के क्षेत्रावर (दोन टक्के) पेरणी झाली आहे. उडदाचे क्षेत्र सात हजार ५०० हेक्टर असून, तब्बल तीन हजार ९४८ हेक्टर क्षेत्रावर ५२.६४ टक्के पेरणी झाली आहे. खरीप ज्वारीची पेरणीच या भागात झाली नाही. बाजरीचे क्षेत्र ९२६ हेक्टर असून, ४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मका पिकाचे सरासरी क्षेत्र दोन हजार ५०० हेक्टर असून, ३६३ हेक्टर क्षेत्रावर, झाली आहे. खरिपाचे तृणधान्याचे क्षेत्र तीन हजार ६७३ हेक्टर असून, ४२९ हेक्टर क्षेत्रावर (११.६८ टक्के) पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांनी तीळ व सूर्यफुलाची पेरणीच केली नाही. सोयाबीनचे क्षेत्र दोन हजार ६०० हेक्टर असून अवघ्या २७१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. धरणातील उपलब्ध पाण्यासाठी चांगला पाऊस होईल या भरवशावर बारा हजार १५७ हेक्टर क्षेत्रावर उसाची नव्याने लागवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.